समुद्रवाणी पाटीवरील ढाबा मालकाची गुंडगिरी 

भाजी चांगली झाली नाही म्हणताच, ग्राहकाला बेदम मारहाण 
 

पाडोळी - उस्मानाबाद तालुक्यातील समुद्रवाणी पाटीवर असलेल्या शिवशाही ढाबा मालकासह अन्य दोन कामगारांनी येथे जेवण करण्यासाठी  आलेल्या एका ग्राहकास जबर मारहाण केली आहे. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध बेंबळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


 समुद्रवाणी पाटी येथे अनिरुध्द राजाभाऊ ढवळे यांचा शिवशाही नावाचा ढाबा असून या ठिकाणी काल दुपारी साडे तीन वाजण्याच्या  दरम्यान टाकळी(बें) ता.उस्मानाबाद येथील दीपक लक्ष्मण सोनटक्के (वय32) हे जेवण करणेसाठी गेले असता, भाजी कशी केली आहे यावरून वाद झाला आणि दोन वेटर (कामगार) आणि ढाबा मालक अनिरुद्ध ढवळे या तिघांनी संगणमत करून जबर मारहाण करून जीवे मारणेची धमकी दिली असल्याची तक्रार  बेंबळी पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आली आहे. याप्रकरणी धाबेमालक अन्य दोन इसमाविरुद्ध कलम ३२३,५०४,५०६, आणि ३४ नुसार  गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 समुद्रवाणी ,पाडोळी (आ) या गावच्या परिसरातील ढाब्यामध्ये  अवैध दारू विक्री राजरोसपणे सुरु असून, या ढाबा  मालकावर पोलीस प्रशासनाने कारवाई करावी अशी सुजाण नागरिकांतून मागणी होत आहे.

From around the web