संचारबंदी: उस्मानाबाद जिल्ह्यात मनाई आदेश झुगारणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 
संचारबंदी: उस्मानाबाद जिल्ह्यात मनाई आदेश झुगारणाऱ्यांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद - जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशाने उस्मानाबाद जिल्ह्यात दि.28.03.2021 रोजी जनताकर्फ्यु जाहीर असतांना सार्वजनिक ठिकाणी विनाकारण बाहेर पडणाऱ्या, प्रवासी वाहतुक करणाऱ्या, हॉटेल व्यवसायासाठी चालू ठेवणाऱ्या, फळगाडे चालू ठेवणाऱ्यांवर जिल्हा भरात पोलीसांनतर्फे खालील प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले.

(1) तुळजापूर येथील बालाजी महादेव कोकाटे हे जुने बसस्थानक, तुळजापूर येथील पानस्टॉल दुकान व्यवसायासाठी चालू ठेवले असतांना तर 1)विनोद मते 2)विनोद कोळी 3)अभिजीत ठोंबरे 4)अभिजीत कोरके 5)फारुक शेख, सर्व रा. भेंड, ता. माढा 6)मंजुर सय्यद 7)मन्सुर सय्यद, दोघे रा. चिंचोली, ता. तुळजापूर हे चिंचोली गावातील चौकात एकत्र जमून आपापसात भांडणे करत असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले.

(2) लायकअली जहीरोद्दीन इनामदार, रा. मुरुम, ता. उमरगा हे उमरगा येथे ऑटोरीक्षा क्र. एम.एच. 25 एम 1813 मध्ये प्रवासी वाहतुक करत असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.

(3) सलमान सलीम शेख, रा. उस्मानाबाद हे ज्ञानेश्वर मंदीरासमोर फळगाड्यावर व्यवसाय करत असतांना आनंदनगर पो.ठा. च्या पथकास आढळले.

(4) लोणी, ता. परंडा येथील शेरखान बबन पठाण हे गावातील जि.प. शाळेसमोर मद्यधुंद अवस्थेत - विनामास्क फिरत असतांना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले.

यावरुन नमूद व्यक्तींविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270, सह महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना क.- 11 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये स्वतंत्र 5 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.

कोविड- 19 च्या संदर्भात मनाई आदेश झुगारणाऱ्यावर नगरपालीकेतर्फे गुन्हा दाखल

 कळंब: काविड- 19 च्या पर्श्वभुमीवर काल रविवार 28 मार्च रोजी मा. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने जनताकर्फ्यु असतांना गांधीनगर, कळंब येथील आकाश श्रीहरी घरत व शिवराज प्रभु होनराव हे दोघे विनाकारण सार्वजनिक ठिकाणी फिरुन त्या मनाई आदेशांचे उल्लंघन केले. यावरुन नगरपालीका कर्मचारी- संजय हाजगुडे यानी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web