मानवी जिवीतास, रहदारीस धोका निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

 
मानवी जिवीतास, रहदारीस धोका निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद - : मानवी जिवीतास धोका होईल अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी हातगाड्यावर अग्नी प्रज्वलीत करुन किंवा निष्काळजीपणे माल वाहतूक करुन किंवा कोविड- 19 चे मनाई आदेश झुगारुन हॉटेल व्यवसायास चालू ठेवून भा.दं.सं. कलम-  283, 285, 188, 279 चे उल्लंघन करणाऱ्या 9 व्यक्तींविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे 4 गुन्हे उस्मानाबाद जिल्हा पोलीसांनी 24- 25 मार्च रोजी दाखल केले.

(1) राम धोंडीबा बनसोडे, रा. चिखली, ता. उस्मानाबाद यांनी मानवी जिवीतास तसेच रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा रितीने ॲपे मॅजीक वाहन क्र. एम.एच. 25 आर 5615 मध्ये ऊस भरून सकनेवाडी शिवारातील रस्त्यावर वाहतूक करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले असतांना उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास आढळले.

(2) ईट, ता. वाशी येथील 1)निशाद दिलशाद काझी 2)बाळासाहेब चंद्रकांत हुंबे यांनी ईट येथे 2 वेगवेगळ्या ठिकाणी आपापल्या ताब्यातील हातगाड्यांवर निष्काळजीपणे अग्नी प्रज्वलीत  करुन भा.दं.सं.कलम- 285 चे उललंघन केले असतांना वाशी पो.ठा. च्या पथकास आढळले.

(3) कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर लोकसेवकाने काढलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन येरमाळा येथील 1)रियाज बशीर शेख 2)अमर जाफर शेख 3)अब्बास मौला शेख 4)भगवान रामभाउ बांगर 5)पांडुरंग शिवाजी मुंढे 6)सोमनाथ विठ्ठल नरसाळे या सर्वांनी रात्री 08.50 वा. सु. येरमाळा, दुधाळवाडी व रत्नापुर फाटा येथील आपापल्या ताब्यातील हॉटेलमध्ये ग्राहकांना बसवून व्यवसाय केला.


निष्काळजीपणाचे कृत्य करणाऱ्या दोघांना आर्थिक दंडाची शिक्षा

 श्रीकांत गणपत कुंभार व शहादुला मेहताब थोडगे, दोघे रा. उस्मानाबाद या दोघांनी उस्मानाबाद शहरात सार्वजनिक रस्त्यावरील आपापल्या हातगाड्यात मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा निष्काळजीपणे अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केल्याने त्यांना प्रत्येकी 300 ₹ दंडाची व दंड न भरल्यास 1 दिवस साध्या कारावासाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उस्मानाबाद यांनी 25 मार्च रोजी सुनावली आहे.

From around the web