अवैध गुटखा विक्री करणाऱ्या 3 व्यक्तींवर गुन्हे दाखल

 

वाशी: अवैध गुटखा बाळगणाऱ्यांविरुध्द 17 मार्च रोजी वाशी शहरातील 3 वेगवेगळ्या पानस्टॉल वर छापे टाकण्यात येउन महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलला अन्नपदार्थ विक्री करणाऱ्यां खालील 3 व्यक्तींवर भा.दं.सं. कलम- 188, 272, 273 आणि अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम- 26, 27, 23 सह वाचन कलम व वाचन अधिनियम अंतर्गत 3 गुन्हे नोंदवले आहेत.

यात पहिल्या घटनेत सुतार गल्ली येथील बप्पा बाबासाहेब येताळ हे आपल्या ‘अनित पानस्टॉल’ मध्ये 2,387 ₹ चा प्रतिबंधीत अन्न पदार्थ (गुटखा, तंबाखुजन्य पदार्थ) बाळगलेले दुसऱ्या घटनेत चेडे गल्ली येथील कैलास पांडुरंग चेडे हे आपल्या ‘शिवशक्ती पानस्टॉल’ मध्ये 1,830 ₹ चा प्रतिबंधीत अन्न पदार्थ (गुटखा, तंबाखुजन्य पदार्थ) बाळगलेले तिसऱ्या घटनेत कुंभारवाडा येथील समीर हनिफ तांबोळी हे आपल्या ‘भाईभाई पानस्टॉल’ मध्ये 908 ₹ चा प्रतिबंधीत अन्न पदार्थ (गुटखा, तंबाखुजन्य पदार्थ) बाळगलेले अन्न सुरक्षा पथकास आढळले. यावरुन अन्न सुरक्षा अधिकारी- श्रीमती रेणुका पाटील यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द गुन्हे नोंदवले आहेत.


निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्यास 1,000 ₹ दंडाची शिक्षा

लोहारा: कास्ती (बु.), ता. लोहारा येथील शेखर राजेंद्र खळे यांनी सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपणे वाहन चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केल्या प्रकरणी मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, लोहारा यांनी आज 18 मार्च रोजी दोषी ठरवून 1,000 ₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.

जुगार खेळल्याबद्दल दोघांना प्रत्येकी 300 ₹ दंडाची शिक्षा

 कळंब: रमेश तुकाराम ताठे व सचिन सुर्यकांत साबळे, दोघे रा. कळंब यांनी जुगार खेळून महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम- 12 (अ) चे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रत्येकी 300 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कळंब यांनी आज 18 मार्च रोजी सुनावली आहे.

सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपणे वाहन चालवणाऱ्या व उभे करणाऱ्या चालकांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद - सार्वजनिक ठिकाणी रहदारीस -मानवी जिवीतास धोका होईल अशा प्रकारे वाहन उभे करून, निष्काळजीपणे वाहन चालवून भा.दं.सं. कलम- 283, 279 चे उल्लंघन करणाऱ्या 4 वाहन चालकांवर 4 गुन्हे  17 मार्च रोजी दाखल करण्यात आले.

1) जळकोट, ता. तुळजापूर येथील नागेश बाबुराव भांगे व तानाजी तुकाराम कानडे या दोघांनी आपापले वाहन अनुक्रमे ऑटोरीक्षा क्र. एम.एच. 23 एक्स 1243 व ऑटोरीक्षा क्र. एम.एच. 25 एम 1096 ही जळकोट बसस्थानक येथे रहदारीस धोकादायरित्या उभे केली असल्याचे नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले.

2) सास्तुर, ता. लोहारा येथील महमद महेबुब औरादे हे ऑटोरीक्षा वाहन मुर्शदपुर येथील सास्तुर- बलसुर रस्त्यावर तर अज्ञात चालकाने वाहन क्र. एम.एच. 25 एपी 0367 हे लोहारा येथील रस्त्यावर निष्काळजीपणे भरधाव वेगात चालवत असतांना लोहारा पो.ठा. च्या पथकास आढळले.

From around the web