उस्मानाबाद जिल्ह्यात जनता कर्फ्यूमध्ये नियम मोडणाऱ्या  20 जणांवर गुन्हे दाखल 

 
उस्मानाबाद जिल्ह्यात जनता कर्फ्यूमध्ये नियम मोडणाऱ्या 20 जणांवर गुन्हे दाखल

उस्मानाबाद - जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशाने उस्मानाबाद जिल्ह्यात दि.21.03.2021 रोजी जनता कर्फ्यु जाहीर असतांना सार्वजनिक ठिकाणी विनाकारण बाहेर पडणाऱ्या, निष्काळजीपणे वाहन चालवणाऱ्या- उभे करणाऱ्या तसेच व्यवसायासाठी दुकाने उघडे ठेवणाऱ्यांवर जिल्हाभरात पोलीसांतर्फे खालील प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले.

(1) तुळजापूर येथील 1)जावेद शेख 2)मैनुद्दीन शेख 3)गणेश नाईकवाडी या तीघांनी तुळजापूर शहरात तीन वेगवेगळ्या ठिकाणी अनुक्रमे दोन चिकन शॉप व एक मटन शॉप व्यवसायासाठी चालू ठेवले असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले.

(2) उस्मानाबाद येथील सादिक सौदागर यांनी माणिक चौक, उस्मानाबाद येथील मटन शॉप व्यवसासाठी चालू ठेवले असतांना आनंदनगा पो.ठा. च्या पथकास आढळले.

(3) घारगाव येथील अमोल गोरे यांनी घारगावा चौकातील आपले ट्रेलर दुकान व्यवसायाठी चालू ठेवले असतांना शिराढोन पो.ठा. च्या पथकास आढळले.

(4) सोनारी, ता. परंडा येथील राहुल काळे, रुबाब तांबोळी, आतिष देशमुख या तीघांनी गावातील आपापले दुकान व्यवसायासाठी चालू ठेवले असतांना आंबी पो.ठा. च्या पथकास आढळले.

(5) उमरगा येथील लक्ष्मण एकंबे, शिवाजी मंमाळे, दत्ता कावाले, सुर्यकांत कांबळे, विश्वनाथ घोडके, संजय हंचाटे, समिर नदाफ, सर्फराज शेख अशा 8 जणांनी उमरगा शहरात आपापल्या ताब्यातील वाहने जनता कर्फ्यु असतांना असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.

(6) आशिव, ता. औसा येथील दत्ता वाघे हे रुईभर येथील सार्वजनिक रस्त्यावर मोटारसायकल बेदरकारपणे, हयगईने चालवत असतांना बेंबळी पो.ठा. च्या पथकास आढळले.

(7) आनाळा, ता. परंडा येथील चंद्रहार ईटकर यांनी आनाळा चौकात रहदारीच्या ठिकाणी मानवी जिवीतास धोका होईल अशारितीने ऑटोरीक्षा वाहन उभा केला असतांना तर कारंजा येथील दशरत गोरे हे मुगाव फाटा येथे मोटारसायकल बेदरकारपणे, हयगईने चालवत असतांना आंबी पो.ठा. च्या पथकास आढळले.

(8) सुंदरवाडी, ता. उमरगा येथील दत्तात्रय वाघमोडे यांनी मुरुम फाटा येथील रहदारीच्या ठिकाणी मानवी जिवीतास धोका होईल अशारितीने ऑटोरीक्षा वाहन उभे केले असतांना मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

यावरुन नमूद 20 व्यक्तींविरुध्द भा.दं.वि. कलम- 188, 269, 270, 279, 283 सह, महाराष्ट्र कोविड- 19 उपाययोजना क.- 11 सह, आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम- 51 (ब) अन्वये स्वतंत्र 20 गुन्हे संबंधीत पो.ठा. येथे नोंदवण्यात आले आहेत.

From around the web