उस्मानाबाद जिल्ह्यात चोरी, मारहाण आदी गुन्हे दाखल 

 
Osmanabad police

तामलवाडी : सोलापूर येथील पांडुरंग हरीश्चंद्र मिटकर हे पत्नीसह दि. 22 ऑगस्ट रोजी सोलापूर ते शिरुर (अ.) असा मोटारसायकलने प्रवास करत होते. प्रवासादरम्यान 09.30 वा. सु. तामलवाडी टोलनाक्यापुढे आले असता पाठीमागून एका मोटारसायकलवर आलेल्या दोन अनोळखी पुरुषांनी मिटकर यांच्या मो.सा. वर पाठीमागे बसलेल्या त्यांच्या पत्नीच्या हातातील एक स्मार्टफोन व 12,000 ₹ रोख रक्कम असलेली पर्स हिसकावून घेउन पोबारा केला. अशा मजकुराच्या पांडुरंग मिटकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 392 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अपघात

भुम  : राहुल दादा चव्हाण, रा. वाल्हा, ता. भुम यांनी दि. 01 ऑगस्ट रोजी 20.30 वा. सु. चुंबळी ते वालवड रस्ता सिमेवर मोटारसायकल क्र. एम.एच. 42 एसी 4185 ही निष्काळजीपने चालवून संतोष परमेश्वर बनकर, वय 36 वर्षे, रा. चुंबळी, ता. भुम हे चालवत असलेल्या मो.सा. क्र. एम.एच. 25 एएफ 0840 ला समोरुन धडक दिली. या अपघातात संतोष बनकर हे गंभीर जखमी होउन वैद्यकीय उपचारादरम्यान मयत झाले. यावरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ), 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
मारहाण 

बेंबळी  : बेंबळी येथील अक्षय व केशव श्रीपतराव नळेगावकर हे दोघे भाऊ दि. 13 ऑगस्ट रोजी 09.00 वा. सु. आंबेवाडी शिवारातील आपल्या शेतात होते. यावेळी आंबेवाडी ग्रामस्थ- पांडुरंग दरेकर यांसह त्यांच्या कुटूंबातील प्रताप, दादासाहेब, रुक्मिनी अशा चौघांनी पुर्वीच्या वदावरुन नमूद नळेगावकर दोघा भावांना कोयत्याने, काठीने मारहान करुन जखमी केले. या मारहानीत अक्षय यांच्या उजव्या हाताच्या करंगळीचे हाड मोडले. अशा मजकुराच्या अक्षय यांनी दि. 22 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 325, 324, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                              

From around the web