सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपणे वाहन चालवणाऱ्या व उभे करणाऱ्या चालकांवर गुन्हे दाखल

 

उस्मानाबाद -  सार्वजनिक ठिकाणी रहदारीस धोका निर्माण होईल, मानवी जिवीतास धोका होईल अशा प्रकारे वाहन उभे करुन, निष्काळजीपणे वाहन चालवून भा.दं.सं. कलम- 283, 279 चे उल्लंघन करणाऱ्या 5 वाहन चालकांवर 5 गुन्हे  15 मार्च रोजी दाखल करण्यात आले.

1) येडशी येथील मिथुन भारत ओव्हाळ हे येडशी येथील रस्त्यावर मोटारसायकल निष्काळजीपणे, हयगईने चालवलवत असतांना उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास आढळले.

2) डिकसळ, ता. कळंब येथील नामदेव गायकवाड हे कळंब येथील कळंब- येरमाळा रस्त्यावर वाहन क्र. एम.एच. 25 बी 748 हे निष्काळजीपणे, हयगईने चालवत असतांना कळंब पो.ठा. च्या पथकास आढळले.

3) उस्मानाबाद येथील शहाबुद्दीन शेख हे शहरातील उस्मानाबाद- तुळजापूर रस्त्यावर वाहन क्र. एम.एच. 25 एके 0755 हे निष्काळजीपणे, हयगईने चालवत असतांना उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकास आढळले.

4) गोजवाडा, ता. वाशी येथील दयानंद थोरबोले हे वाशी येथील चौकात ॲपे मॅझीक वाहन क्र. एम.एच. 02 वायए 0528 हा निष्काळजीपणे, हयगईने चालवत असतांना वाशी पो.ठा. च्या पथकास आढळले.

5) तडवळा, ता. उस्मानाबाद येथील गोविंद आडसुळ हे ढोकी बस थांबा चौकातील रस्त्यावर ऑटोरिक्षा क्र. एम.एच. 25 एम 739 हा निष्काळजीपणे, हयगईने चालवत असतांना ढोकी पो.ठा. च्या पथकास आढळले.

From around the web