कोविड मनाई आदेश झुगारुन हॉटेल चालू ठेवणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

 
Osmanabad police

आंबी : कोविड-19 च्या पार्श्वभुमीवर अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी मास्क वापर, दुकाना संबंधी वेळेचे निर्बंध असे इत्यादी जारी केले आहेत. असे असतांनाही 1) बाबासाहेब हनुमंत बीबे 2) लक्ष्मण संभाजी मांडवे, दोघे रा. कुक्कडगाव, ता. परंडा यांनी दि. 12 जुलै रोजी 16.40 वा. सु. गावातील बस स्थांब्याजवळील आपापल्या ताब्यातील हॉटेल तर 3) सुमनेशकुमार श्रीबखेडीसिंह यादव, रा. अनाळा, ता. परंडा यांनी 19.10 वा. सु. अनाळा बस थांब्याजवळील आपले स्विटमार्ट व्यवसायाच चालू ठेवले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद तीघांविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत स्वतंत्र 3 गुन्हे नोंदवले आहेत.

 सार्वजनिक रस्त्यावर निष्काळजीपने वाहन उभे करणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल

परंडा : अथर्व सुनील कुलथे, रा. पुणे यांनी दि. 12 जुलै रोजी 12.20 वा. सु. परंडा येथील बार्शी रस्त्यावर मोटारसायकल क्र. एम.एच. 13 बीसी 8852 ही रहदारीस अडथळा निर्माण होईल व अपघात होउन जिवीतास धोका निर्माण होईल अशा रितीने उभा केली असतांना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 283 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
सार्वजनिक ठिकाणी बेदरकारपने वाहन चालवणाऱ्यावर गुन्हा दाखल

 उस्मानाबाद - सतीश सुभाष राठोड, रा. घाटंग्री, ता. उस्मानाबाद हे दि. 12 जुलै रोजी उस्मानाबाद शहरातील संत गाडगेबाबा चौक येथील रस्त्यावर ॲपे मजीक वाहन क्र. एम.एच. 24 एफ 7392 ही स्वत:च्या व इतरांच्या जिवीतास धोका निर्माण होईल अशारितीने हयगईने, बेदरकारपने चालवत असतांना उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


दोन आरोपींस आर्थिक दंडाची शिक्षा

उस्मानाबाद -  कोविड-19 संबंधी मनाई आदेशांचे उल्लंघन करुन व कोविड संसर्गाची शक्यता निर्माण करुन भादसं कलम- 188, 269 चे तामलवाडी पो.ठा. हद्दीत उल्लंघन करणा-या 1) ज्ञानेश्वर नेटके यांना व आंबी पो.ठा. हद्दीत उल्लंघन करणाऱ्या 2) राहुल काळे यांना प्रत्येकी 500 रुपये  आर्थीक  दंडाची  शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, तुळजापूर व परंडा यांनी आज दिनांक 13 जुलै  रोजी सुनावली आहे.

From around the web