विदुयत चोरी करणा-याय दोघांवर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

उस्मानाबाद : नांदगाव येथील बाळासाहेब नामदेव घंटे  व महेशकुमार जवाहर चिनगंडे  यांनी मागील सहा महिन्यापासुन एल टी लाईनवर अनधिकृतरित्या आकडा टाकुन  वीज चोरी करुन भारतीय विदुयत कायदा कलम 135 चे उल्लंघन केले  असल्याचे दिनांक 02.07.2021 रोजी  महावितरणच्या पथकास आढळले होते. यावर नमुद काळात चोरलेल्या विजेचे शुल्क व दंड रक्कम भरण्यास सांगुन तसे न केल्यास  गुन्हा दाखल होईल  असे पथकाने त्यांना कळवले होते. तरीही नमुद दोघांनी ते वीज देयक-दंड रक्कम न भरल्याने सहाय्यक अभियंता,प्रविण लक्ष्मण गायकवाड यांनी दिनांक 08.07.2021 रोजी दिलेल्या दोन प्रथम खबरेवरुन दोन गुन्हे  नोदंविण्यात आलेले आहेत.

अपघात

 नळदुर्ग:  फैसल हनिफ शेख, रा. अणदुर  हे  दिनांक 21 जुन रोजी 14.00 वा  नळदुर्ग येथील एम एस ई बी कार्यालया समोरील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 65 वरुन  मोटारसायकल चालवत जात होते.  यावेळी पाठीमागुन आलेल्या अज्ञात चालकाने ट्रक क्रमांक एम एच 11 ए एल 1816 ही  निष्काळजीपणे चालवुन पुढे जाण्याच्या प्रयत्नात फैसल यांच्या मोटारसायकलला हुलकावणी  दिल्याने फैसल शेख यांची मोटारसायकल ट्र्रकला पाठीमागुन धडकली. या अपघातात फैसल यांच्या दोन्ही मनगटाची हाडे मोडुन मोटारसायकलचे नुकसान झाले. अशा मजकुराच्या फैसल शेख यांनी  दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 338,427  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अतिक्रमण

 लोहारा:  अमिन शेख, रा. येणेगुर यांच्या जेवळी  येथील शेतात गावकरी विश्वनाथ व शामल हावळे, रामेश्वरी कासेगावे,  मैनाबाई बिराजदार यांनी दि. 04- 05 जुलै रोजी दरम्यानच्या  रात्री अतिक्रमण करुन उडीद पिकाचे नुकसान केले. अशा मजकुराच्या अमिन शेख यांनी  दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 447, 427, 34   अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web