सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या मद्यपीवर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

 उमरगा: वसंत सायबण्णा अबाचणे, रा. भिमनगर, उमरगा याने दि. 26.05.2021 रोजी 11.30 वा. सु. उमरगा शहरातील आरोग्य नगर कॉर्नर येथे मद्यधुंद अवस्थेत मोठमाठ्याने आरडा- ओरड करुन गोंधळ घालून सार्वजनिक शांततेचा भंग केला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र मद्य निषेध कायदा कलम- 85 (1) सह म.पो.का. कलम- 112 / 117 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

.
अवैध मद्य विरोधी कारवाया

 शिराढोण : अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन शिराढोन पो.ठा. च्या पथकाने दि. 26 मे रोजी पोलीस ठाणे हद्दीत तीन वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. यात पहिल्या घटनेत जनक राठोड, रा. घारगाव तांडा, ता. कळंब हे राहत्या तांड्यावर एका बॅरलमध्ये गावठी दारु निर्मीतीचा 200 लि. द्रव पदार्थ व 20 लि. गावठी दारु (एकुण किं.अं. 11,900 ₹) बाळगलेले तर दुसऱ्या घटनेत राणीबाई पवार, रा. भाटशिरपुरा, ता. कळंब या गावातील पारधी पिढी येथे एका कॅनमध्ये 20 लि. गावठी दारु (किं.अं. 800 ₹) बाळगलेल्या तर तीसऱ्या घटनेत रामदास माने, रा. नागुलगाव, ता. कळंब हे एकुरगा- देवधारोरा रस्त्यालगत एका पिशवीत देशी दारुच्या 9 बाटल्या (किं.अं. 540 ₹) बाळगलेले असतांना पथकास आढळले.

 येरमाळा: दत्ता माळी, रा. गौर, ता. कळंब हे दि. 26 मे रोजी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ एका कॅनमध्ये 5 लि. गावठी दारु (किं.अं. 420 ₹) अवैधपणे बाळगलेले असतांना येरमाळा पो. ठा. च्या पथकास आढळले.

  यावरुन पोलीसांनी मद्य निर्मीतीचा द्रव पदार्थ जागीच ओतून नष्ट केला तर उर्वरीत मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web