बेंबळी :खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा

 
बेंबळी :खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीस आजन्म कारावासाची शिक्षा

बेंबळी: बेंबळी पो.ठा. गु.र.क्र. 81 / 2016 या खूनाचा तपास तत्कालीन पोउपनि- श्री दंडे यांनी करुन उस्मानाबाद सत्र न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले होते. या खटल्याचा निकाल आज 20 मार्च रोजी जाहिर होउन आरोपी- बालाजी विश्वनाथ सरवदे, रा. सुंभा, ता. उस्मानाबाद यास खून केल्याबद्दल भा.दं.सं. कलम- 302 अंतर्गत आजन्म कारावासह 3,000 ₹ दंड व दंड न भरल्यास अतिरीक्त 3 महिन्याच्या साध्या कारावासाची तसेच भा.दं.सं. कलम- 504 अंतर्गत 1 वर्षे सक्त मजुरीसह 500 ₹ दंड व दंड न भरल्यास अतिरीक्त 1 महीना साध्या कारावासाची शिक्षा सत्र न्यायाधिश श्री एम.जी. देशपांडे यांनी सुनावली आहे.

विविध गुन्ह्यातील 5 आरोपींना आर्थिक दंडाच्या शिक्षा

 कळंब: मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणे, बेदरकारपणे वाहन चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केल्याबद्दल एका आरोपीस 1,000 ₹ दंडाची शिक्षा व दंड न भरल्यास 7 दिवस साध्या कारावासाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, कळंब यांनी 19 मार्च रोजी सुनावली आहे.

 उमरगा: मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपणे, बेदरकारपणे वाहन चालवून भा.दं.सं. कलम- 279 व मो.वा.का. कलम- 3 (1)/ 181 चे उल्लंघन केल्याबद्दल आरोपी- लिंबराज तुळशीराम स्वामी, रा. उमरगा यास 1,000 ₹ दंडाची शिक्षा तर स्वप्नील सतीष सोनवने, रा. उमरगा यांनी मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा रितीने सार्वजनिक रस्त्यावर वाहन उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याबद्दल 200 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, उमरगा यांनी 19 मार्च रोजी सुनावली आहे.

 परंडा: बाबूराव यल्लपा पवार यांनी मानवी जिवीतास धोका निर्माण होईल अशा रितीने सार्वजनिक रस्त्यावर वाहन उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केल्याबद्दल 200 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांनी 19 मार्च रोजी सुनावली आहे.

 भूम: भुम येथील पार्डी रस्त्यालगत आपल्या हातगाड्यावर अग्नी प्रज्वलीत करुन मानवी जिवीतास धोका निर्माण होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य जाफर शेख, रा. भुम यांनी करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केल्याबद्दल 200 ₹ दंडाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, भुम यांनी 19 मार्च रोजी सुनावली आहे.

From around the web