बेटजवळगा येथे वकिलास मारहाण 

 
Osmanabad police

उमरगा: ॲडव्होकेट आनंदा वाकोडे, रा. औरंगाबाद  हे दिनांक 30 जुन रोजी बेटजवळगा  येथील आपल्या सासुरवाडीत  आले असता खटला चालवण्याच्या वादातुन गावकरी  कांबळे  कुटुंबीय कृष्णा , महादेव , मनोहर, लखना  अशा बारा  स्त्री- पुरुषांनी   आनंदा यांसह त्यांचे सासरे, शालक यांना शिवीगाळ करुन, ठार मारण्याची धमकी देउन प्लास्टीक नळया, काठीने मारहाण  करुन ठार मारण्याचा प्रयत्न केला.

अशा मजकुराच्या  वाकोडे यांच्या प्रथम खबरे वरुन भादसं कलम 307, 324, 504, 506, 34 सह अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

लोहारा: समुद्राळ येथील दिलीप व सुनिता अंबुरे हे दीर- भावजय दिनांक 30 जुन रोजी 17.30 वा शिवारातील शेतात काम करत होते. यावेळी शेत बांधाच्या वादातुन भाउबंद- सुभाष रघुनाथ अंबुरे  यांनी ठार मारण्याची धमकी देउन दिलीप  व सुनिता यांच्यावर चाकु हल्ला करुन त्यांना जखमी केले. अशा मजकुराच्या दिलीप यांनी  दिनांक 01 जुलै रोजी वैदयकिय उपचारा दरम्यान दिलेल्या निवेदना वरुन भादसं कलम 307, 324,323, 504,506  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उमरगा : बेटजवळगा येथील कृष्णा व  आशिष  महादेव कांबळे हे दोघे बंधु  दिनांक 30 जुन रोजी 09.00 वा गावातील चौकात होते. या वेळी पुर्वीच्या वाद-खटल्याच्या संदर्भातुन भाउबंद- माणीक, संतोष, मसाजी यांनी   कृष्णा व आशिष यांना  शिवीगाळ करुन लाथा बुक्यांनी, काठीने  मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या प्रथम खबरे वरुन भादसं कलम 324, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                  

From around the web