उस्मानाबाद जिल्ह्यात जुगार विरोधी कारवाया

 
Osmanabad police

तुळजापूर: काक्रंबा, ता. तुळजापूर येथील 1)लखन थोरात 2)विष्णु झाडे 3)आदित्य साबळे 4)बापु वडगावकर 5)नामदेव ढेरे 6)अमोल मस्के 7)फिरोज अन्सारी 8)सुरेश मस्के हे सर्वजण दि. 30 मे रोजी काक्रंबा झोपडपट्टी परिसरात तिरट जुगार चालवण्याचे साहित्यासह 7 भ्रमणध्वनी व 7,360 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद -  1)आशिष नंदु सुरवसे 2)अश्रुबा दिलीप वारे, दोघे रा. उस्मानाबाद हे दोघे दि. 31 मे रोजी शहरातील गवळी हॉस्पीटल समोरील रस्त्याबाजूच्या झाडाखाली कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 3,430 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना स्था.गु.शा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा आनंदनगर पो.ठा. येथे नोंदवला आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाई

 ढोकी: अविनाश अनिल माने, रा. रामवाडी, ता. उस्मानाबाद हे दि. 30 मे रोजी गावातील आपल्या पानटपरीसमोर अवैध विक्रीच्या उद्देशाने देशी दारुच्या 13 बाटल्या (किं.अं. 676 ₹) बाळगलेले असलेले ढोकी पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web