उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य आणि जुगार विरोधी कारवाया

 

उस्मानाबाद -  चंद्रशेखर, रा. उस्मानाबाद हे 31 मार्च रोजी मध्यवर्ती इमारत, उस्मानाबाद येथील चौकात मेजवानी हॉटेलमध्ये विदेशी दारुच्या 4 बाटल्या अवैधपणे विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगले असतांना आनंदनगर पो.ठा. च्या पथकास आढळले.

 लोहारा: भरत गोकुळ साळुंके, रा. धानुरी, ता. लोहारा हे 31 मार्च रोजी धानुरी येथील बाजार चौकात देशी दारुच्या 10 बाटल्या अवैधपणे विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना लोहारा पो.ठा. च्या पथकास आढळले.

मुरुम: अचलेर, ता. लोहारा येथील प्रकाश निवृत्ती यमगर हे 31 मार्च रोजी अचलेर येथील शेतात 8 लि. अवैध गावठी दारु विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

 
जुगार विरोधी कारवाया

उस्मानाबाद - जुगार खेळत असल्याच्या गोपनीय माहितीवरुन स्था.गु.शा. च्या पथकाने 31 मार्च रोजी तेर शिवारातील ‘जनता हॉटेल’ जवळ छापा मारला. यावेळी 1)लक्ष्मण आंबादास राउत 2)शेरखान सजीर केरबु, दोघे रा. तेर, 3)आदेश भागवत मते 4)अमोल फुलचंद मगर, दोघे रा. वाघोली, 5)भारत संभाजी उंबरे, रा. वाणेवाडी यांसह अन्य चार पुरुष हे तिरट जुगार साहित्यासह 7 मोटारसायकल व रक्कम असा एकुण 1,25,000 ₹ चा माल बाळगले असतांना पथकास आढळले.

 नळदुर्ग: लोहगाव, ता. तुळजापूर येथील काशिनाथ जनार्धन नागिले हे 31 मार्च रोजी नळदुर्ग येथील ‘सुपर चायनीज’ या दुकानाजवळ कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 425 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले.

यावरुन पोलीसांनी जुगार साहित्य व रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web