उस्मानाबाद जिल्ह्यात पाच ठिकाणी अवैध मद्य विरोधी कारवाया

 

उस्मानाबाद -  उस्मानाबाद पोलीसांनी काल रविवार 28 मार्च रोजी जिल्हाभरात अवैध मद्य विरोधी 5 कारवाया करुन गुन्ह्यातील अवैध मद्य जप्त करुन संबंधीत व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पोलीस ठाण्यात 5 गुन्हे नोंदवले आहेत.

(1) दत्ता देवेंद्र बिराजदार, रा. एकोंडी (ज.), ता. उमरगा हे लक्ष्मी फाटा- एकुरगा रस्त्यालगतच्या विटभट्टी येथे देशी दारुच्या 24 बाटल्या अवैधपणे विक्री करण्याच्या उद्देशाने तर हुसन्या अमलया तेलंग, रा. कदेर, ता. उमरगा हे आपल्या पत्रा शेडसमोर 14 लि. गावठी दारु विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगले असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.

(2) बन्सी खुबा चव्हाण, रा. होळी तांडा हे तांडा परिसरात 6 लि. गावठी दारु विक्री करण्याच्या उद्देशाने तर तिरुपती परशुराम उत्तम, रा. कानेगाव, ता. लोहारा हे आपल्या घरासमोर देशी दारुच्या 15 बाटल्या अवैधपणे विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगले असतांना लोहारा पो.ठा. च्या पथकास आढळले.

(3) मंगरुळ, ता. कळंब येथील सिध्देश्वर संभाजी गायकवाड हे मंगरुळ फाटा येथील गायरान जागेत 5 लि. गावठी दारु अवैधपणे विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना शिराढोन पो.ठा. च्या पथकास आढळले.

(4) अंजनसोंडा, ता. भुम येथील दादा मोटे हे आपल्या राहत्या घराच्या मागे देशी दारुच्या 8 बाटल्या अवैधपणे विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना वाशी पो.ठा. च्या पथकास आढळले.

From around the web