उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई

 
उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई

 नळदुर्ग: अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन नळदुर्ग पो.ठा. च्या पथकाने दि. 28 एप्रील रोजी पो.ठा. हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले.

पहिल्या घटनेत आनंद भारत कोरे, रा. सराटी, ता. तुळजापूर हे फुलवाडी शिवारातील टोलनाक्याजवळील रशिका हॉटेलच्या मागे 180 मि.ली. देशी दारुच्या 16 बाटल्या (किं.अं. 832 ₹) अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असतांना आढळले.

दुसऱ्या घटनेत सुनिल राजेंद्र पाटोळे, रा. मानेवाडी, ता. तुळजापूर हे मानेवाडी शिवारातील स्वत:च्या पानटपरीत अवैध विक्रीच्या उद्देशाने 180 मि.ली. देशी दारुच्या 9 बाटल्या (किं.अं. 468 ₹) बाळगलेले असतांना आढळले.

उमरगा: माधव सोमला चव्हाण, रा. बलसुर, ता. उमरगा हे 28 एप्रील रोजी बलसुर- रामपुर रस्त्यालगतच्या पत्रा शेडसमोर एका प्लास्टीकच्या बाटलीत 20 लि. गावठी दारु (किं.अं. 810 ₹) अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.

            यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web