उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई

 
उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई

 येरमाळा : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन येरमाळा  पो. ठा. च्या पथकाने 20 एप्रील रोजी कडकनाथवाडी येथे छापा टाकला. यावेळी लक्ष्मण काळे रा. तेरखेडा, लक्ष्मी परधी पीढी, हे 9 लिटर गाहभ दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना पथकास आढळले.

 तामलवाडी : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन तामलवाडी पो. ठा. च्या पथकाने 20 एप्रील रोजी काटी येथे छापा टाकला. यावेळी शहाजी नागनाथ क्षिरसागर रा. काटी, ता. तुळजापुर हे 15 लिटर गाहभ दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना पथकास आढळले.

 शिराढोण : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन शिराढोण पो. ठा. च्या पथकाने 20 एप्रील रोजी नायगाव येथे छापा टाकला. यावेळी बापु उर्फ बबलु मारुती चव्हाण रा. नायगाव  ता. कळंब हे 10 लिटर गाहभ दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना पथकास आढळले.

यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद त्यांच्याविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतागृत 3 गुन्हे नोंदवले आहेत.

जुगार विरोधी कारवाई

आंबी : जुगार चालु असल्याच्या गोपनीय खबरे वरुन आंबी पोलीसांनी 20 एप्रील रोजी दोन छापे टाकले. पहील्या छाप्यात अनाळा येथील कालीकादेवी मंदीराचे झाडाखाली शिध्देश्वर, श्रीमंत, हणुमंत, विशाल, दत्ता शिंदे, आप्पा वामन, मगन गिलबीले, सर्व रा. अनाळा  हे तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहीत्य व 3470 ₹ रकमेसह आढळले. तर दुस-या छाप्यात अनाळा चौकात, पांडुरंग, दत्तात्रय, तानाजी अंकुश, सुभाष तांबोळी, कैलास रणदिवे, सर्व रा. अनाळा  हे तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहीत्य व 4290 ₹ रकमेसह आढळले.

या वरुन त्यांच्या विरुध्द महाराष्ट् जुगार प्रतिबंधक कायदा  अंतर्गत  2 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web