उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई

 
उस्मानाबाद जिल्ह्यात अवैध मद्य विरोधी कारवाई

शिराढोण : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन शिराढोण  पो. ठा. च्या पथकाने 17 एप्रील रोजी लोहटा (पु) येथे छापा टाकला. यावेळी सारीका तानाजी पवार हया 20 लिटर गाहभ दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना पथकास आढळले.

 मुरुम : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन मुरुम  पो. ठा. च्या पथकाने 18 एप्रील रोजी भुसणी-मुरळी रोडलगत छापा टाकला. यावेळी मौलकुमार ऊर्फ मोहन कमलाकर वासुदेव रा. भुसणीवाडी हे 20 लिटर गाहभ दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना पथकास आढळले.

 शिराढोण : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन शिराढोण  पो. ठा. च्या पथकाने 18 एप्रील रोजी शिराढोण येथे छापा टाकला. यावेळी सचिन सुधाकर माकोडे हे श्रावणी बारचे पाठीमागे विदेशी दारुच्या 15 बाटल्या  अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना पथकास आढळले.

 तुळजापुर : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन तुळजापुर पो. ठा. च्या पथकाने 18 एप्रील रोजी हंगरगा (तु )येथे छापा टाकला. यावेळी अमोल विजय लोंढे हे देशी व विदेशी दारुच्या 19 बाटल्या  अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना पथकास आढळले.

यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद आरोपीविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत 4 गुन्हे नोंदवले आहेत.

अपघात

 नळदुर्ग: सुरेश सुभाष पवार वय 24 वर्षे रा. बेळमतांडा व त्याचा मामा हे दोघे  8 एप्रिल  रोजी 11.30 वा. सु. नळदुर्ग शिवारातुन अणदुर येथे मोटार सायकल क्र. एम. एच. 25 एटी 5283 ने जात होते. या वेळी मो. सा. क्र. एम. एच. 25 एपी 6458 चा अज्ञात चालक हा आपली मो. सा. ही निष्काळजीपणे चुकीच्या दिशेने चालवून सुरेश यांच्या मो. सा. ला  धडक दिली. या अपघातात सुरेश हे गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या सुरेश पवार यांनी वैदयकीय उपचारा दरम्यान दिलेल्या निवेदनावरुन भा. दं. सं. कलम- 279, 337, 338  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.            

From around the web