बेंबळी, ढोकी मध्ये अवैध मद्य विरोधी कारवाई

 
Osmanabad police

 बेंबळी: महेबुब शेख, रा. बेंबळी, ता. उस्मानाबाद हे दि. 21 मे रोजी गावातील इदगाह परिसरात 10 लि. गावठी दारु (किं.अं. 500 ₹) अवैधपणे विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असतांना बेंबळी पो.ठा. च्या पथकास आढळले.

 ढोकी: सिध्देश्वर जाधव, रा. भिमनगर, कोंड, ता. उस्मानाबाद हे दि. 21 मे रोजी कोंड येथील बस थांब्याजवळील चौकात एका कॅनमध्ये 5 लि. गावठी दारु (किं.अं. 210 ₹) अवैधपणे विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले असतांना ढोकी पो.ठा. च्या पथकास आढळले.

            यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

जुगार विरोधी कारवाई

 ढोकी: सुभाष दादाहरी गाढवे, रा. ढोकी, ता. उस्मानाबाद हे दि. 21 मे रोजी ढोकी येथील पेट्रोलीयम विक्री केंद्राजवळच्या पानटपरी शेजारी मिलन नाईट मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 1,050 ₹ रोख रक्कम बाळगलेले असतांना ढोकी पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी जुगार साहित्यासह रोख रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द म.जु.का. अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

पोलीस ठाण्याच्या आवारात गोंधळ घालणाऱ्या मद्यपीवर गुन्हा दाखल

 उमरगा: विकास उध्दव माने, रा. माडज, ता. उमरगा याने दि. 21.05.2021 रोजी 16.00 वा. सु. उमरगा पो.ठा च्या आवारात मद्यधुंद अवस्थेत मोठमाठ्याने आरडा- ओरड करुन गोंधळ घालून महाराष्ट्र मद्य निषेध कायदा कलम- 85 (1) चे उल्लंघन केले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो.ठा. येथे गुन्हा नोंदवला आहे.

From around the web