आंबीत तरुणीचा लैंगिक छळ, गुन्हा दाखल 

 

 आंबी :  जिल्हयातील एका खेडेगांवातील 21 वर्षीय तरुणीस गावातीलच एका तरुणाने विवाहाचे आमिष दाखवुन जुन 2020 पासुन वेळोवेळी तिचे लैंगिक शोषण करुन त्या  प्रसंगांचे तरुणीच्या नकळत अनेकदा  मोबाईल फोन द्वारे छायाचित्रण केले. याकामी त्या तरुणास त्याच्या आई, वडील, बहीण यांनी सहकार्य केले. अशा मजकुराच्या संबंधीत तरुणीने 7 एप्रिल रोजी दिलेल्या  प्रथम खबरेवरुन भा.द.सं.कलम 376, 114 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरी

 ढोकी: मुक्तार बागवान रा. जागजी हे 6-7 एप्रिल दरम्यानच्या रात्री जागजी येथील एका शेतात इतरांसह झोपले होते. यावेळी मुक्तार यांसह इतरांनी चार्जींगला लावलेले 10 भ्रमण ध्‌वनी अज्ञाताने चोरुन नेले. अशा मजकुराच्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं.कलम 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपघात

 नळदुर्ग: चैतन्य शिवधन सोनवणे वय 18 वर्ष रा. तुळजापुर याने 16 मार्च रोजी 15.00 वा तुळजापुर नळदुर्ग रस्तयावरील गंधोरा शिवारात मोटार सायकल क्रमांक एम एच 13 ए व्ही 6181 निष्काळजीपणे चालवल्याने घसरली. या अपघातात चैतन्य याच्या डोक्यास दुखापत होवुन त्याचा मृत्यु झाला. तर पाठीमागे बसलेला मुन्नालाल मोरे जखमी झाला. अशा मजकुराच्या मयताचे भाऊ संतोष यांनी दि.07 एप्रिल रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.द.सं.कलम 279, 304(अ), 337, मोवाका कलम 184  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web