अवैध मद्य आणि जुगार विरोधी कारवाई 

 
अवैध मद्य आणि जुगार विरोधी कारवाई

शिराढोण : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन शिराढोण पोलीसांनी 14 एप्रील रोजी कळंब-लातुर रस्त्यावरील हॉटेल शिवार व राजवाडा येथे दोन छापे टाकले. पहिल्या छाप्यात विजय ज्ञानोबा पवार रा. करंजकल्ला, हे अवैध विक्रीच्या उद्देशाने 11,010 रु. ची देशी व विदेशी दारु जवळ बाळगला असतांना तर दुस-या छाप्यात गौतम अंकुश किल्लारे रा. खडकी  हे अवैध विक्रीच्या उद्देशाने 2300 रु. ची  विदेशी दारु जवळ बाळगला असतांना आढळला.

 मुरुम : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन मुरुम पोलीसांनी 14 एप्रील रोजी शिवाजी चौक मुरुम येथे छापा टाकला. यावेळी सिद्राम विठठल बनसोडे रा. आनंदनगर, मुरुम  हे 10 लिटर गाहभ दारु  जवळ बाळगला असतांना आढळले.

उमरगा : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन उमरगा पोलीसांनी 14 एप्रील रोजी मळगी ता. उमरगा येथे छापा टाकला. यावेळी दिलीप तात्याराव सुर्यवंशी रा.  मळगी  हे 25 लिटर गाहभ दारु  जवळ बाळगला असतांना आढळले.

 कळंब : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन कळंब पोलीसांनी 14 एप्रील रोजी अंदोरा शिवारात छापा टाकला. यावेळी रामा रघु चव्हाण रा. आंदोरा,  हे  देशी दारुच्या 67 बाटल्या जवळ बाळगला असतांना आढळले.

 नळदुर्ग : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन नळदुर्ग पोलीसांनी 14 एप्रील रोजी फुलवाडी पाटी येथे छापा टाकला. यावेळी परमेश्वर प्रकाश बिराजदार रा. केशेगाव ता. तुळजापुर,  हे  देशी दारुच्या 12 बाटल्या जवळ बाळगला असतांना आढळले.

 परंडा : अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन परंडा पोलीसांनी 14 एप्रील रोजी भिमनगर परंडा येथे छापा टाकला. यावेळी हणुमंत काशिनाथ सोनवणे रा. परंडा,  हे  देशी दारुच्या 12 बाटल्या जवळ बाळगला असतांना आढळले.

यावरुन पोलीसांनी नमुद मद्य जप्त करुन संबंधीत पोलीस ठाण्यांत 7 गुन्हे महाराष्ट्र मद्य निषेध कायदयांतर्गत नोंदवले आहेत.


जुगार विरोधी कारवाई

 उमरगा : जुगार चालु असल्याच्या गोपनीय खबरे वरुन उमरगा  पथकाने 14 एप्रील रोजी शहरात छापा टाकला. यावेळी शिरीष निर्मळे, रा. कदेर,  विक्रांत कटके, रा. उमरगा, हे कदेर येथील पत्राशेडच्या समोर कल्याण मटका जुगार खेळताना 1130 ₹ रकमेसह आढळले.  यावरुन दोघांविरुध्द महाराष्ट् जुगार प्रतिबंधक कायदा  अंतर्गत  गुन्हा नोंदवला आहे.

From around the web