रस्त्यात धोकादायकरीत्या वाहन उभे करणाऱ्या चालकावर कारवाई

 

कळंब : रामराजे कांबळे, रा. डिकसळ ता.कळंब  यांनी दि. 13.01.2021 रोजी कळंब तहसील कार्यालया समोरील रस्त्याने मानवी जिवीतास धोका होईल अशा रितीने लोखंडी नळ मिनी ट्रकच्या बाहेर आलेल्या अवस्थेत वाहतुक केली. यावरुन पोलीसांनी सरकातर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन कांबळे यांच्या विरुध्द भा.दं.सं. कलम- 283 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

अपघात 

मुरुम: कमलाकर राठोड,रा.काळा निंबाळा ता.उमरगा हे दि.11.01.2021 रोजी 18.30 वा सु काळा निंबाळा परिसरातुन ॲपे रिक्षा चालवत जात होते. या वेळी अज्ञात चालकाने ट्रॅक्टर- ट्रेलर निष्काळजीपणे चालवुन राठोड यांच्या रिक्षाला पाठीमागुन धडक दिल्याने रिक्षा पलटुन रिक्षातील 4 प्रवाशांसह चालक राठोड हे किरकोळ जखमी झाले. अपघाता नंतर नमुद अज्ञात ट्रॅक्टर- ट्रेलर चालक जखमींना वैदयकीय उपचाराची तजवीज न करता तसेच अपघाताची खबर पोलीसांना न देता घटनास्थळावरुन वाहनासह पसार झाला.अशा मजकुराच्या कमलाकर राठोड यांनी दि.13.01.2021 रोजी दिलेल्या प्रथ्म खबरेवरुन अज्ञात ट्रॅक्टर- ट्रेलर चालकाविरुध्द भा.द.सं. कलम 279,337,338 सह मो.वा.का. कलम 134 अ.ब, 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
मारहाण

 मुरूम:  कंटेकुर, ता.उमरगा येथील अरुन व विजय ग्यानबा धुमाळ या दोघा भावांच्या  कुटुंबात  दि. 13.01.2021 रोजी 08.30 वा. शेतामध्ये पाणी वाटपाच्या कारणावरुन भांडणे झाली. या वेळी   विजय  यासह त्याच्या कुटुंबीयांनी अरुन यासह त्याच्या कुटुंबास  शिवीगाळ करून, काठी व दगडाने मारहाण करुन ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या अरुन धुमाळ यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन विजय धुमाळ यासह त्याच्या 5 कुटुंबीयांविरुध्द  भा.दं.सं. कलम- 143, 147, 149, 323, 324, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web