दोन वर्षापासुन पाहिजे असलेला आरोपी ताब्यात

 
Osmanabad police

उस्मानाबाद  -  पो.ठा. आनंदनगर गु.र.क्र. 323 / 2019 भा.दं.सं. कलम- 326, 325, 504, 506 या मारहानीच्या गुन्ह्यातील आरोपी- स्वप्नील अर्जुन चौगुले, वय 21 वर्षे, रा. तांबरी विभाग, उस्मानाबाद हा मागील 2 वर्षापासुन पोलीसांना तपासकामी हवा होता. स्था.गु.शा. च्या पोउपनि- श्री. सदानंद भुजबळ, पोहेकॉ- शेळके, पोकॉ- बलदेव ठाकुर, सर्जे यांच्या पथकाने त्यास आज दि. 11.06.2021 रोजी तांबरी विभाग परिसरातून ताब्यात घेउन पुढील कार्यवाहीस्तव आनंदनगर पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.


कोविड मनाई आदेश उल्लंघन करणाऱ्या चौघांना प्रत्येकी 500₹ दंडाची शिक्षा

 तामलवाडी: आपापल्या ताब्यातील दुकाने, हॉटेल व्यवसायास चालू ठेउन कोविड- 19 संबंधी मनाई आदेश व भा.दं.सं. कलम- 188, 269 चे उल्लंघन करणाऱ्या 4 गुन्ह्यांतील 4 व्यक्तींना प्रत्येकी 500 ₹ दंडाची व दंड न भरल्यास 5 दिवसाच्या साध्या कारावासाची शिक्षा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, तुळजापूर यांनी दि. 10.06.2021 रोजी सुनावली आहे.

 अवैध मद्य विरोधी कारवाई

लोहारा: सोपान युवराज चिमुकले, रा. सास्तुर, ता. लोहारा हे दि. 10 जून रोजी मुर्शदपूर शिवारातील युवराज बियर शॉपी समोर देशी दारुच्या 8 बाटल्या (किं.अं. 480 ₹) अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना लोहारा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web