15 वर्षांपासून पाहिजे असलेला आरोपी ताब्यात

 
Osmanabad police

उस्मानाबाद -  पो.ठा. उस्मानाबाद (श.) गु.र.क्र. 60 / 2006 भा.दं.सं. कलम- 395, 427, 436, 295, 337, 147, 148, 149 या गुन्ह्यातील आरोपी- विशाल वैजीनाथ सरवदे, वय 42 वर्षे, रा. भीमनगर, उस्मानाबाद हा मागील 15 वर्षापासुन पोलीसांना पाहिजे होता. स्था.गु.शा. च्या पोहेकॉ- घुगे, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- आरसेवाड यांच्या पथकास तो गावी आल्याची गोपनीय माहिती मिळताच त्यास काल दि. 09.06.2021 रोजी शिताफीने ताब्यात घेउन पुढील कार्यवाहीस्तव उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या ताब्यात दिले आहे.

चोरी

आंबी: सौरभ साधु गरड, रा. चिंचपुर (खुर्द), ता. परंडा हे दि. 10- 11.04.2021 दरम्यानच्या रात्री आपल्या राहत्या घरी झोपलेले असतांना त्यांच्या उशाचा स्मार्टफोन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला. अशा मजकुराच्या सौरभ गरड यांनी दि. 09 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
वाशी: रणजित ज्ञानेश्वर पोतदार, रा. माउलीनगर, वाशी यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञात चोरट्याने दि. 08- 09.06.2021 दरम्यानच्या रात्री तोउून घरातील 20 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व 14,000 ₹ रोख रक्कम चोरुन नेली. अशा मजकुराच्या रणजित पोतदार यांनी दि. 09 जून रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 अपघात

वाशी: चालक- अक्षय संतराम तोडकर, रा. गोजवाडा, ता. वाशी यांनी दि. 06 जून रोजी 08.30 वा. सु. वाशी शिवारातील टेकाळे यांच्या कुकूटपालन शेडजवळील रस्त्यावर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एपी 6693 ही निष्काळजीपणे चालवून समोरुन येणाऱ्या स्कुटर क्र. एम.एच. 13 सीआर 5684 ला धडक दिली. या अपघातात स्कुटरवरील गोपीनाथ भानुदास सरवदे, रा. वाशी यांसह त्यांची मुलगी- वैष्णवी हे दोघे गंभीर जखमी झाले असून मो.सा. चालक- तोडकर यांसह पाठीमागे बसलेले सुधीर जगताप हे दोघे जखमी झाले. अशा मजकुराच्या धनाजी केरबा वाघमारे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web