विनयभंगातील आरोपीस एक वर्षे कारावासासह आर्थिक दंड

 
Osmanabad police

आंबी  : महिलेस मारहान करुन भा.दं.सं. कलम- 323 चे उल्लंघन केल्याबद्दल 6 महिने सश्रम कारावासासह 1,000 ₹ दंड आणि महिलेचा विनयभंग करुन भा.दं.सं. कलम- 354 चे उल्लंघन केल्याबद्दल 1 वर्षे सश्रम कारावास व 2,000 ₹ दंडाची शिक्षा कार्ला, ता. परंडा येथील अक्षय अरुण गटकळ यांस प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, परंडा यांनी काल दि. 18 ऑगस्ट रोजी सुनावली आहे.

 जुगार खेळल्याप्रकरणी एका आरोपीस आर्थिक दंड

वाशी : जुगार खेळून महाराट्र जुगार प्रतिबंध कलम- 12 (अ) चे उल्लंघन केल्याबद्दल वाशी येथील रमेश लिंबराज मोळवणे यांना 300 ₹ दंडाची शिक्षा काल दि. 18 ऑगस्ट रोजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, वाशी यांनी सुनावली आहे.

जुगार विरोधी कारवाई

कळंब  : रणजित हारकर, रा. शिवाजीनगर, कळंब हे दि. 18 ऑगस्ट रोजी कळंब येथील रंगीला चौकात कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 920 ₹ रोख रक्कम बाळगलेले कळंब पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 अवैध मद्य विरोधी कारवाई

उमरगा  :  गावठी दारु भट्टी चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन उमरगा पो.ठा. च्या पथकाने दि. 18 ऑगस्ट रोजी 17.10 वा. सु. बेडगा शेत शिवारात छापा मारला. यावेळी 1)संजय पवार 2) बालाजी जमादार 3) खलील जमादार, तीघे रा. डिग्गी, ता. उमरगा 4) गुलाब राठोड, रा. होलुर तांडा 5) राजेंद्र गणपती माने हे सर्वजण राजेंद्र माने यांच्या शेतात गावठी दारु निर्मीतीचा 180 लि. द्रवपदार्थ व 15 लि. गावठी दारु बाळगलेले पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी मद्यार्क निर्मीतीचा द्रवपदार्थ जागीच ओतून नष्ट केला व गावठी दारु जप्त करुन नमूद पाच जणांविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web