लोहाऱ्यात अपघातातील मृत्यूस  कारणीभुत ठरणाऱ्या आरोपीस सहा महिन्याची शिक्षा 

 
लोहाऱ्यात अपघातातील मृत्यूस कारणीभुत ठरणाऱ्या आरोपीस सहा महिन्याची शिक्षा

लोहारा: लोहारा पो.ठा. येथे दाखल असलेल्या गु.र.क. 36 / 2018 भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब), 136 (1), 177 या निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात करुन मृत्युस काणीभुत ठरल्याच्या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोहेकॉ- बी.एल. जाधव यांनी करुन न्यायालयात नमूद कायदा- कलमान्वये दोषारोप सादर केले होते. खटला क्र. 54 / 2018 चा निकाल आज 23 फेब्रुवारी रोजी जाहिर झाला. मा. प्रथमवर्ग न्यायालय क्र.-1 चे न्यायाधिश श्री. जे. आर. राऊत यांनी आरोपी- दयानंद अपय्या स्वामी, वय 60 वर्षे रा. लोहारा यास उपरोक्त नमूद कलमांच्या अपराधाबद्दल 2,100 ₹ दंड व 6 महिने साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

जुगार खेळल्या प्रकरणी दोघांना प्रत्येकी 300 ₹ दंडाची शिक्षा

शिराढोण : सलीम मोहियोद्दीन सय्यद, रा. रांजणी, ता. कळंब यांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम- 12 (अ) चे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना मा. प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी, कळंब यांनी आज 23 फेब्रुवारी रोजी 300 ₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.

  वाशी: हणुमंत पांडुरंग शिंदे, रा. खानापूर, ता. वाशी यांनी महाराष्ट्र जुगार कायदा कलम- 12 (अ) चे उल्लंघन केल्याबद्दल त्यांना मा. प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी, वाशी यांनी आज 23 फेब्रुवारी रोजी 300 ₹ दंडाची शिक्षा सुनावली आहे.

From around the web