आंबीत चोरीच्या साहित्यासह आरोपी ताब्यात

 
d

आंबी: ज्ञानेश्वर दगडु तोंडे, रा. सोनेगांव, ता. जामखेड, जि. अहमदनगर यांच्या चिंचपुर (बु.), ता. परंडा येथील वाळुच्या ठेक्यावरील तंबुतील डीव्हीआर, इनव्हर्टर व बॅटरी असे साहित्य दि. 01- 02.05.2021 दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले होते. यावरुन आंबी पो.ठा. येथे गु.र.क्र. 84 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 457, 380 नुसार दाखल आहे.

            गुन्हा तपासा दरम्यान आंबी पो.ठा. चे सपोनि- श्री आशिष खांडेकर, पोहेकॉ- होडशिळ, पोकॉ- रामकिसन कुंभार, आडसुळ यांच्या पथकाने गुन्ह्याच्या कार्यपध्दतीचा विश्लेषनात्मक अभ्यास करुन व खबऱ्यामार्फत मिळालेल्या माहितीच्या आधारे नजिम नसिर शेख, वय 25 वर्षे, रा. चिंचपूर, ता. परंडा यास आज दि. 01.05.2021 रोजी ताब्यात घेउन त्याच्या ताब्यातून नमूद चोरीचे साहित्य जप्त केले आहे.

तीन ठिकाणी चोरी 

 बेंबळी: प्रमोद प्रभाकर कोळगे, रा. केशेगाव, ता. उस्मानाबाद यांची होंडा शाईन मोटारसायकल क्र. एम.एच. 13 एएस 3279 ही दि. 31.05.2021 दरम्यानच्या रात्री त्यांच्या राहत्या घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या प्रमोद कोळगे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत ईरफान मुनशिर शेख, रा. कनगरा, ता. उस्मानाबाद यांसह गावातील 7 व्यक्ती दि. 30- 31.05.2021 दरम्यानच्या रात्री कनगरा गट क्र. 209 मधील शेतातील पत्रा शेडसमोर झोपलेले होते. दरम्यान त्यांच्या उषाचे एकुण 7 भ्रमणध्वनी अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले. अशा मजकुराच्या ईरफान शेख यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद - शामराव लक्ष्मण राठोड, रा. शिंगोली तांडा, ता. उस्मानाबाद यांची हिरो होंडा पॅशन मोटारसायकल क्र. एम.एच. 24 के 8677 ही दि. 27.05.2021 रोजी 10.30 वा. सु. न्यायालयाच्या गेटसमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या शामराव राठोड यांनी दि. 31 मे रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web