कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान चोरीच्या मुद्देमालासह आरोपी ताब्यात

 
s

उस्मानाबाद - जिल्ह्यातील गुन्हेगारीस आळा बसावा यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री राज तिलक रौशन यांच्या आदेशावरुन वेळोवेळी कोम्बिंग ऑपरेशन राबवले जाते. असेच एक कोम्बिंग ऑपरेशन स्था.गु.शा. चे पोनि-  गजानन घाडगे, सपोनि-  मनोज निलंगेकर, पोउपनि- पांडुरंग माने, भुजबळ, पोहेकॉ- काझी, पोना- शेळके, महेश घुगे, हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, टेळे, पोकॉ- अशोक ढगारे, पांडुरंग सावंत, सर्जे, कोळी, अविनाश मरलापल्ले, आरसेवाड, ठाकूर, होळकर यांसह पोलीस मुख्यालयातील दंगा काबू पथक हे काल दि. 18.05.2021 रोजी 03.00 ते 07.00 वा. चे दरम्यान उस्मानाबाद तालुक्यातील जुनोनी शिवारात करत होते.

            कोम्बिंग ऑपरेशन दरम्यान 1)बाळू शहाजी शिंदे 2)करण दिलीप भोसले 3)इंदुबाई दिलीप भोसले, तीघे रा. जुनोनी, ता. उस्मानाबाद 4)विजय बाबलींग्या भोसले, रा. झरेगाव, ता. बार्शी व एक विधीसंघर्षग्रस्थ बालक यांच्या ताब्यात तीन मोटारसायकल, विविध कंपन्यांचे 19 भ्रमणध्वनी, 10 ग्रॅम वजनाचे सुवर्ण दागिने, 15,000 ₹ रोख रक्कम आढळली. त्यांच्या ताब्यातील नमूद वाहने, सुवर्ण व भ्रमणध्वनी यांच्याबाबत त्यांना पोलीसांनी मालकी- ताबा या विषयी विचारले असता ते समाधानकारक माहिती देउ न शकल्याने पोलीसांनी तांत्रीक तपास केला. त्यावर आढळले की त्यांच्या ताब्यात आढळलेली वाहने, सुवर्ण व भ्रमणध्वनी हे चोरीस गेल्यावरुन खालील गुन्हे दाखल आहेत.

1)बेंबळी पो.ठा. गु.र.क्र. 84 / 2021 भा.दं.सं. कलम- 457, 380.

2)बेंबळी पो.ठा. गु.र.क्र. 84/ 2011 भा.दं.सं. कलम- 307, 363.

3)उस्मानाबाद (श) पो.ठा. गु.र.क्र. 117 / 2021 भा.दं.सं. कलम- 380.

4)ढोकी पो.ठा. गु.र.क्र. 151 / 2021 भा.दं.सं. कलम- 379.

5)उस्मानाबाद (श.) पो.ठा. मिसींग क्र. 216 / 2021.

6)उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. फौ.प्र.सं. कलम- 41 (1) (ड).

7)सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी पो.ठा. गु.र.क्र. 49 / 2021 भा.दं.सं. कलम- 379.

8)बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई (श.) पो.ठा. गु.र.क्र. 31 / 2021 भा.दं.सं. कलम- 379.

            यावर पोलीसांनी नमूद वाहने, सुवर्ण व भ्रमणध्वनींसह आरोपींनी चोरी करण्यास वापरलेली वॅगन आर कार जप्त करुन नमूद 5 आरोपींस ताब्यात घेतले आहे. उर्वरीत मालासंदर्भात सोलापूर व बीड जिल्हा पोलीसांना माहिती देण्यात आली असून त्या गुन्ह्यांचा तपास सोलापूर व बीड पोलीस करणार आहेत. 

From around the web