चोरीच्या मोटारसायकलसह आरोपी ताब्यात

 
d

उस्मानाबाद  -  पाथर्डी, ता. कळंब येथील अनिल लाला पवार उर्फ बबलू, वय 22 वर्षे हा गेल्या काही दिवसांपासून एक मोटारसायकल संशयास्परित्या बाळगुन आहे.  अशी गोपनीय खबर स्था.गु.शा. च्या पोनि- श्री गजानन घाडगे यांच्या नेतृत्वाखालील पोउपनि- श्री पांडुरंग माने, पोना- हुसेन सय्यद, अमोल चव्हाण, पोकॉ- बबन जाधवर, अविनाश मरलापल्ले, आरसेवाड, माने यांच्या पथकास मिळाली होती. यावर पथकाने काल दि. 23 जून रोजी अनिल पवार यास मोटारसायकलसह ताब्यात घेउन मो.सा. च्या नोंदणी कागदपत्रे, मालकी- ताबा या विषयी विचारले असता त्याने समाधानकारक माहिती दिली नाही.

यावर पथकाने चोरीच्या मोटारसायकल सांगाडा- इंजीन क्रमांकाच्या सहायाने तांत्रीक शोध घेतला असता ती मोटारसायकल येरमाळा पो.ठा. हद्दीतून चोरीस गेल्यावरुन गु.र.क्र. 77 / 2021 भा.दं.सं. कलम- 379 नुसार दाखल असल्याचे समजले. यावरुन अनिल पवार यास मो.सा. सह ताब्यात घेउन येरमाळा पोलीसांच्या ताब्यात दिले आहे. 

वाशीत अवैध गुटखा विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

वाशी: फिरोज हमीद तांबोळी, रा. वाशी यांनी विक्रीच्या उद्देशाने छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी येथील आपल्या टपरीत महाराष्ट्र शासन प्रतिबंधीत अन्न पदार्थ गुटखा बाळगला आहे. अशा गोपनीय खबरेवरुन अन्न व औषध प्रशासन, उस्मानाबाद यांच्या पथकाने दि. 23.06.2021 रोजी 13.57 वा. सु. नमूद ठिकाणी छापा टाकला असता त्या ठिकाणी 6,095 ₹ किंमतीचा गुटखा, पानमसाला पथकास आढळला.

यावरुन अन्नसुरक्षा अधिकारी- श्रीमती रेणुका पाटील यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरवेरुन भा.दं.सं. कलम- 328, 188, 272, 273 सह अन्न सुरक्षा व मानके कायदा कलम- 26, 27, 23 सह वाचन अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपने वाहन उभे करणाऱ्या चालकांवर गुन्हे दाखल

 उमरगा: 1)लक्ष्मण मुळे 2)शरद घाटे, दोघे रा. जकेकुर, ता. उमरगा 3)शिवराज माळी 4)नेताजी जमादार 5)संतोष माळी, तीघे रा. तुरोरी, ता. उमरगा या पाच जणांनी आपापल्या ताब्यातील ऑटोरिक्षा तर 6)भवर ज्ञाराराम, रा. उमरगा यांनी आपल्या ताब्यातील स्विफ्ट डिझायर कार दि. 23 जून रोजी आरोग्य कॉर्नर, उमरगा येथील सार्वजनिक रस्त्यावर धोकादायकरित्या रहदारीस अडथळा निर्माण होईल अशारितीने उभी केली. यावरुन पोलीसांनी सरमारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 283 अंतर्गत स्वतंत्र 6 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web