आंबीत चोरीच्या मोटारसायकलसह आरोपी अटकेत

 
आंबीत चोरीच्या मोटारसायकलसह आरोपी अटकेत

आंबी: बजाज डिस्कव्हर मोटारसायकल चोरीस गेल्यावरुन आंबी पो.ठा. गु.र.क्र. 09 / 2021 भा.दं.सं. कलम- 379 दाखल आहे. तपासादरम्यान आरोपी- सुनिल सफ्या शिंदे उर्फ गुल्ल्या, वय 20 वर्षे, रा. पांढरेवाडी, ता. परंडा यास आंबी पो.ठा. चे सपोनि- श्री आशिष खांडेकर, पोहेकॉ- होडशीळ, पोना- सम्राट माने, संदीप चौगुले यांच्या पथकाने 23 मार्च रोजी नमूद मोटारसायकलसह ताब्यात घेतले असून पुढील तपास करण्यात येत आहे.


जुगार विरोधी कारवाया

उस्मानाबाद : जुगार चालू असल्याच्या गोपनीय खबरेवरुन उस्मानाबाद पोलीसांनी 22 मार्च रोजी जिल्हाभरात वेगवेगळ्या 3 ठिकाणी छापे मारुन जुगार साहित्य व रोख रक्कम जप्त केली असुन महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम- 12 (अ), 4, 5 चे उल्लंघन केल्या प्रकरणी 9 व्यक्तींविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे खालील प्रमाणे 3 गुन्हे दाखल केले आहेत.

(1) घाटशिळ रोड, तुळजापूर येथील संग्राम दिलीप नाईकवाडी हे आपल्या घरात 1)प्रसाद दिलीप रोचकरी 2)विशाल आण्णासाहेब माने 3)वैभव विष्णु मात्रे 4)समर्थ कुमार सिरसाठ 5)व्यंकट धनराज शिंदे या सार्वांना एकत्र जमवून तिरट जुगार खेळत असतांना जुगार साहित्यासह 6 भ्रमणध्वनी, स्कुटर असा एकुण 70,280 ₹ चा माल बाळगले असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले.

(2) जेकेकुर, ता. उमरगा येथील बालाजी गुंडेराव कांबळे हे उमरगा येथील प्रभात हॉटेलमागे कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 350 ₹ बाळगलेले उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.

(3) जळकोट, ता. तुळजापूर येथील सुर्यकांत आण्णाराव नळगे व रज्जाक गफुर शेख हे दोघे जळकोट येथे कल्याण मटका जुगार चालवण्याचे साहित्य व 9,320 ₹ रोख रक्कम बाळगले असतांना स्था.गु.शा. च्या पथकास आढळले.

 अवैध मद्य विरोधी कारवाई

शिराढोन: जायफळ रोड, शिराढोन येथील पिंटु माणिक काळे हे 22 मार्च रोजी राहत्या पत्रा शेडसमोर देशी दारुच्या 14 बाटल्या व 18 ‍‍लि. गावठी दारु (किं.अं. 1,750 ₹) विक्री करण्याच्या उद्देशाने अवैधरित्या बाळगलेले उपविभागीय पोलीस अधिकारी, कळंब यांच्या पथकास आढळले.

पोलीस ठाणे, शिराढोन: भाटशिरपुरा, ता. कळंब येथील संभाजी शिवाजी गायकवाड हे 22 मार्च रोजी गावशिवारातील एका पत्रा शेडजवळ देशी दारुच्या 6 बाटल्या (किं.अं. 312 ₹) विक्री करण्याच्या उद्देशाने अवैधरित्या बाळगलेले शिराढोन पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी नमूद अवैध मद्य जप्त करुन महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत 2 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web