पानगांवच्या व्यक्तीस एका महिलेचा कॉल आला आणि ७० हजाराला चुना लागला 

 

येरमाळा: अनिल गंगाधर चौधरी, रा. पानगांव, ता. कळंब यांच्या भ्रमणध्वनीवर 01 एप्रील रोजी दुपारी एका महिलेने कॉल करुन क्रेडीट कार्डचा विमा काढण्याच्या बहाण्याने चौधरी यांना क्रेडीट कार्ड क्रमांक व पासवर्ड विचारले. यावर अनिल चौधरी यांनी त्या महिलेस तशी माहिती सांगीतली असता त्यांच्या भ्रमणध्वनीवर दोन वेळा गोपनीय ओटीपीचे संदेश आले. ते ओटीपी संदेश वाचून समजून न घेता चौधरी यांनी निष्काळजीपणा दर्शवून त्या महिलेस ओटीपी सांगीतले. यावर त्यांच्या बँक खात्यातून अनुक्रमे 50,225 ₹ व 20,500 ₹ असे दोन व्यवहारात एकुण 70,725 ₹ रक्कम अन्यत्र स्थलांतरीत झाली. अशा मजकुराच्या अनिल चौधरी यांनी 02 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 419, 420 सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 66 (सी) (डी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 अपघात

 नळदुर्ग: सागर मल्‍लीनाथ हत्ते, रा. काझीकणबस, ता. अक्कलकोट हे दि. 19.01.2021 रोजी 18.00 वा. सु. अणदुर येथील स्मशानभुमीजवळील रस्त्याने मोटारसायकल क्र. एम.एच. 13 एयु 9756 ही चालवत जात होते. दरम्यान सचिन रमेश राठोड, रा. चिवरी पाटी, ता. तुळजापूर यांनी मोटारसायकल चुकीच्या दिशेने निष्काळजीपणे चालवून सागर हत्ते यांच्या मो.सा. ला धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या सागर हत्ते यांनी 02 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 उस्मानाबाद (ग्रा.): चालक- अरविंद राजाराम जाधव, रा. उस्मानाबाद यांनी दि. 06.03.2021 रोजी 20.30 वा. सु. येडशी येथील रेल्वे स्थानक रस्त्यावर वाहन क्र. एम.एच. 25 एयु 0155 हे निष्काळजीपणे चालवून रस्त्याने पायी जाणाऱ्या दिलीप काशिनाथ पवार, रा. येडशी, ता. उस्मानाबाद यांना पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. अशा मजकुराच्या दिलीप पवार यांनी 02 एप्रील रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338 सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अवैध मद्य विरोधी कारवाई

तामलवाडी: अवैध मद्य विक्री होत असल्याच्या गोपनीय खबरेवरुन तामलवाडी पो.ठा. च्या पथकाने पांगधरवाडी, ता. तुळजापूर येथे 2 वेगवेगळ्या ठिकाणी छापे मारले. यावेळी आबाराव सुनिल जाधव व नागनाथ सुरेश क्षिरसागर हे दोघे पांगधरवाडी येथे एकत्रीत विदेशी दारुच्या 6 बाटल्या व 10 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगले असतांना पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद दोघांविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत स्वतंत्र 2 गुन्हे नोंदवले आहेत.

From around the web