पाटोदामध्ये अवैध सावकारी करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

 

 बेंबळी: गणेश संभाजी माळी, रा. पाटोदा, ता. उस्मानाबाद यांनी गावकरी- तानाजी राजगुरु यांच्याकडून सन- 2004 मध्ये 27,000 ₹ कर्ज घेतले होते. त्या कर्ज- व्याजापोटी राजगुरु यांनी माळी यांची 10 आर शेतजमीन विकत घेतल्याचे सहकार अधिकारी- सहकारी संस्था, उस्मानाबाद यांनी माळी यांच्या तक्रार अर्जावरील चौकशीत निष्पन्न झाले आहे. अशा मजकुराच्या सहकार अधिकारी- बालाजी सावतर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन महाराष्ट्र सावकारी प्रतिबंधक कायदा कलम- 39 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मानवी जिवीतास, रहदारीस धोका निर्माण करणाऱ्या 7 व्यक्तींवर गुन्हे दाखल

: मानवी जिवीतास धोका होईल अशा प्रकारे सार्वजनिक ठिकाणी हातगाड्यावर अग्नी प्रज्वलीत करुन किंवा बेदरकारपणे, निष्काळजीपणे वाहन चालवून किंवा वाहन उभे करुन भा.दं.सं. कलम-  283, 285, 279 चे उल्लंघन करणाऱ्या 7 व्यक्तींविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे 7 गुन्हे उस्मानाबाद जिल्हा पोलीसांनी 23 मार्च रोजी दाखल केले.

(1) आकाश बेले, रा. तडवळा यांनी तुळजापूर- उस्मानाबाद रस्त्यावर तर दत्तात्रय जगताप, रा. हंगरगा यांनी विश्वनाथ कॉर्नर येथे ऑटोरीक्षा रहदारीस धोका- अडथळा होईल अशा प्रकारे उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले.

(2) परंडा, येथील फकीर पठाण यांनी ऑटोरीक्षा, अनिल पवार यांनी टाटा व्हिस्टा कार तर आण्णासाहेब इंगळे यांनी महिंद्रा पिकअप ही वाहने परंडा शहरातील 3 विविध ठिकाणी रहदारीस धोका- अडथळा होईल अशा प्रकारे उभे करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले असतांना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले.

(3) उस्मानाबाद येथील श्रीकांत पवार यांनी उस्मानाबाद येथील बेंबळी रस्त्यावर हातगाड्यावर निष्काळजीपणे अग्नी प्रज्वलीत  करुन भा.दं.सं.कलम- 285 चे उललंघन केले असतांना उस्मानाबाद (श.) पो.ठा. च्या पथकास आढळले.

(4) इम्रान आळंदकर यांनी लोहारा येथील सार्वजनिक रस्त्यावर ऑटोरीक्षा बेदरकारपणे, निष्काळजीपणे चालवून भा.दं.सं. कलम- 279 चे उल्लंघन केले असतांना लोहारा पो.ठा. च्या पथकास आढळले.

From around the web