ढोकीत कोविड मनाई आदेश झुगारुन व्यवसायास चालू ठेवणाऱ्यांवर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

ढोकी : कोविड- 19 च्या पार्श्वभुमीवर अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उस्मानाबाद यांनी मास्क वापर, दुकाना संबंधी वेळेचे निर्बंध इत्यादी मनाई आदेश जारी केले असुन या आदेशांचे उल्लंघन करुन दि. 02 जुलै रोजी  23.10 वा ढोकी  येथील आपली पान टपरी  व्यवसायास चालु ठेवली असल्याचे ढोकी  पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 188, 269 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 पशु क्रुरता.

तुळजापूर : तुळजापूर पो.ठा चे पथक दिनांक 02 जुलै रोजी 23.00 वा रात्र गस्त करत असतांना गावाबाहेरच्या  महामार्गावरील  बार्शी रस्ता येथे दोस्त वाहन क्रमांक एम एच 25 पी 3060 जातांना दिसले. संशयावरुन पथकाने त्या वाहनाची झडती घेतली असता शंकर खरात, सादीक मुजावर दोघे रा. सोलापुर, वैभव चंदे, इम्रान कुरेशी दोघे रा. औसा हे त्या वाहनातुन अन्न पाण्याची व्यवस्था न करता विनापरवाना  व दाटीवाटीने गुरे वाहुन नेत असल्याचे आढळले. या वरुन तुळजापूर पोलीसांनी सरकार तर्फे दिलेल्या प्रथम खबरे वरुन पशु क्रुरता अधिनियम कलम 11 व मपोका कलम 119 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.


अवैध मद्य विरोधी कारवाई

 उमरगा :  अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन उमरगा पो.ठा. च्या पथकाने दि.  03  जूलै रोजी  19.00 वा डिग्गी  येथे छापा टाकला असता गोपिचंद सोमला पवार हे त्यांचे राहते घरासमोर गावठी दारु  10 लीटर दारु अवैधपणे  बाळगलेले  आढळले. तर 19.40 वा डिग्गी येथीलच संजय वामन सुर्यवंशी हे त्यांचे राहते घरासमोर 09 लीटर गावठी दारु अवैधपणे  बाळगलेले  आढळले.

 यावरुन पोलीसांनी अवैध महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हे  नोंदवले आहेत.

 
जुगार विरोधी कारवाया

अंबी : दिनांक 03 जुलै रोजी 15.00 वा अंबी पोलीसांनी  शेळगाव येथे छापा टाकला असाता माणीक नगर येथील चिंचेच्या झाडाखाली 1) ज्ञानोबा शेडकर, 2) बापु शेडकर, 3) नारायण  गागंर्डे, 4) भारत शेडकर, 5) शंकर गागंर्डे, 6) प्रकाश  शेडकर, 7) बाबु शेडकर, 8) गणेश गुनवरे, 9) दादा गागंर्डे, 10) रमेश गागंर्डे सर्व रा. शेळगाव ता. परंडा  व  11) बाळु सावंत रा. सावंतवस्ती चिंचपुर (बु) तिरट जुगार चालवण्याचे साहित्यास‍ह मिळुन आले. तसेच त्यांच्या या कृत्यामुळे कोनोना संसर्ग पसरण्याचा दाट संभव असल्याने  पोलीसांनी जुगार साहित्यासह रक्कम जप्त करुन नमूद व्यक्तींविरुध्द भादसं 269 व म.जु.का. अंतर्गत  व गुन्हा नोंदवला आहे.

 
तुळजापूर : दिनांक 03 जुलै रोजी 20.10 वा तुळजापूर पोलीसांनी तुळजापूर बस स्थानक पाठीमागे सुलभ सौचालय जवळ छापा मारता असात जावेद करीमोशीन (हुसेन) शेख, रा.वासुदेव गल्ली ,तुळजापूर हे मिलन नाईट मटका जुगार खेळत व खेळवित असतांना साहित्यास‍ह  मिळुन आले. नमूद व्यक्ती  विरुध्द म.जु.का. अंतर्गत  व गुन्हा नोंदवला आहे.

From around the web