ढोकीत मनाई आदेश झुगारुन पदयात्रा, सभा घेणाऱ्यांवर गुन्हा दाखल

 

 ढोकी: काविड- 19 च्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात मा. जिल्हाधिकारी यांचे विविध मनाई आदेश लागू असून त्या आदेशांचे उल्लंघन करुन 1) दत्ता बबन देशमुख 2)अंकुश जाधव 3)अजित खोत 4)निहाल काझी 5)संग्राम देशमुख 6)अमोल समुद्रे 7)गफार काझी 8)संतोष देशमुख 9)माणिक वाकुरे 10)मंगेश तिवारी 11)तानाजी माळी 12)रवि गरड, सर्व रा. ढोकी 13)लक्ष्मण सरडे, रा. पळसप 14)सुशिल गडकर, रा. तुगाव या सर्वांनी 700- 800 लोकांना जमवून 22 फेब्रुवारी रोजी 10.30 ते 12.00 दरम्यानच्या काळात ढोकी येथील हनुमान मंदीर- पेट्रोल पंप- तेरणा साखर कारखाना अशी पदयात्रा काढून सभा घेतली. यावरुन पोलीसांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद लोकांविरुध्द भा.दं.सं. कलम- 188, 269, 34 सह कोविड- 19 उपाययोजना नियम- 11 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

चोरी

नळदुर्ग: भिवंडी, ‍‍जि. ठाणे, येथील मृनालिनी स्वामी या 18 फेब्रुवारी रोजी सोलापूर- उमरगा असा प्रवास एसटी बसने करत होत्या. प्रवासादरम्यान बस अणदूर बसस्थानकात 12.45 वा. आली असता त्यांच्या पिशवीतील पर्समध्ये असलेले 45 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, 9,500 ₹ रोख रक्कम व एटीएम- पॅन कार्ड गर्दीचा फायदा घेउन अज्ञाताने चोरुन नेले. अशा मजकुराच्या मृनालिनी स्वामी यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 ढोकी: कोळेवाडी, ता. उस्मानाबाद येथील संतोष पोपट आकोसकर यांच्या राहत्या घराचा कडी- कोयंडा अज्ञात व्यक्तीने 22 फेब्रुवारी रोजीच्या रात्री तोडून घरातील कपाटातील 70 ग्रॅम सोन्याचे दागिने जुने वापरते व 7,500 ₹ रोख रक्कम असा माला चोरुन नेला. अशा मजकुराच्या संतोष आकोसकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
अपघात

नळदुर्ग: मुर्टा फाटा येथे 21 फेब्रुवारी रोजी 20.00 वा. सु. अज्ञात चालकाने- एसटी बस क्र. एम.एच. 14 बीटी 5029 ही निष्काळजीपणे चालवून बाजूच्या वाहनास ओलांडतांना मोटारसायकल क्र. एम.एच. 24 एव्ही 1720 हीला पाठीमागून धडक दिली. या अपघातात मो.सा. वर पाठीमागे बसलेल्या पार्वती प्रभाकर चपहे, वय 32 वर्षे, रा. लोहारा या मयत झाल्या तर त्यांचा मुलगा- मानव चपहे यासह मो.सा. चालक- संतोष पवार हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर नमूद एसटी बसचा अज्ञात चालक घटनास्थळावर बस सोडून पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचे भाऊ- परमेश्वर रमेश मुळे, रा. अणदुर, ता. तुळजापूर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 337, 338, 304 (अ) आणि मो.वा.का. कलम- 184, 134 (अ) (ब) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

मारहाण

 नळदुर्ग: बेडगे नगर, नळदुर्ग, ता. तुळजापूर येथील 1)बालाजी रेवा चव्हाण 2)शांताबाई चव्हाण 3)अजय श्रीराम जाधव या तीघांनी पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन 22 फेब्रुवारी रोजी 09.30 वा. सु. गावकरी- श्रीहरी लिंबाजी पवार यांच्या घरात घुसून श्रीहरी यांसह त्यांची आई- सुशिलाबाई पवार यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच बालाजी चव्हाण याने ठार मारण्याच्या उद्देशाने श्रीहरी यांच्या गालावर, बरगडीवर चाकुने वार करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या श्रीहरी लिंबाजी पवार यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 324, 452, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

उस्मानाबाद : पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन साठे चौक, उस्मानाबाद येथील 1)अतुल चव्हाण 2)अविनाश चव्हाण 3)आकाश चव्हाण 4)अश्विन चव्हाण 5)लक्ष्मण कांबळे या सर्वांनी 21 फेब्रुवारी रोजी 21.40 वा. सु. जुना बसडेपो जवळील गणपती मंदीराजळ रोहण रामु देवकते, रा. देवकते गल्ली, उस्मानाबाद यांना रस्त्यात अडवून शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच चाकुचा धाक दाखवून रोहण यांच्या खिशातील 10,500 ₹ जबरीने काढून घेतले. अशा मजकुराच्या रोहण देवकते यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 341, 327, 323, 143, 147, 149, 504, 506 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web