आंबीत गुटखा बाळगणा-यावर गुन्हा दाखल

 
Osmanabad police

आंबी:  अनाळा गावातील मैमुनाबी शहाबर्फीवाले यांच्या घरावर  दिनांक 03.07.2021 रोजी 17.00 वा   आंबी पोलीसांनी छापा टाकला असता  31,531 रुपये किमतीचा गुटखा  हा प्रतिबंधीत अन्न  पदार्थ  आढळला होता. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाच्य अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रेणुका पाटील यांनी  दि  05.07.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरे वरुन भादसं 328, 188,272, 273, सह वाचन  अधि नियम अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे

कडबा गंज जाळणा-या अज्ञातावर  गुन्हा दाखल

तामलवाडी :  मसला  (खुर्द )येथील तुकाराम शिंदे यांनी घरा शेजारी उभारलेली सुमारे दोन हजार कडबा  पेढयांची  गंज अज्ञाताने  दिनांक 04-5  जुलै दरम्यानच्या रात्री पेटवुन दिल्याने नष्ट झाली.अशा मजकुराच्या तुकाराम  यांनी दिलेल्या  प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 435 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                  

From around the web