येरमाळ्यात महिलेला व्हाट्सॲपद्वारे अश्लील मजकुर पाठवणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
d

येरमाळा: एका महिलेला व्हाट्सॲपद्वारे अश्लील मजकुर पाठवणाऱ्यावर येरमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित तरुणावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. 


येरमाळा पो.ठा. हद्दीतील एका 35 वर्षीय महिलेस (नाव- गाव गोपनीय) दि. 30 मे रोजी 16.17 ते 19.13 वा. दरम्यान एका अज्ञात मोबाईल क्रमांकावरुन व्हाट्सॲपद्वारे अश्लील संदेश येउ लागले. तो क्रमांक परिचयाचा नसल्याने आपल्यास कोणीतरी जाणुनबुजून त्रास देत असल्याचे त्या महिलेस समजले. यावर त्या महिलेने दिलेल्या प्रथम खबरेवरुन अज्ञात मोबाईल क्रमांक धारक व्यक्तीविरुध्द भा.दं.सं. कलम- 354 (ड) सह माहिती तंत्रज्ञान कायदा कलम- 67, 67 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 
मारहाण


 उस्मानाबाद  -  तुळजापूर नाका, उस्मानाबाद येथील रस्त्यावर दि. 28 मे रोजी 13.00 वा. सु. एका महिलेकडून तीच्या स्कुटरचा धक्का अजय दशरथ काळे, रा. तुळजापूर नाका यांना लागला. यावेळी अजय काळे यांनी त्या महिलेच्या स्कुटरची चावी काढून घेतली असता तेथे उपस्थीत असलेले नाना शिवाजी पेठे, रा. तुळजापूर नाका यांनी तसे न करण्यास अजय काळे यांना विनंती केली.

 यावर अजय काळे यांसह विशाल काळे, अजय काळे अशा तीघांनी संगणमताने नाना पेठे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, खोऱ्याने मारहान करुन जखमी केले. अशा मजकुराच्या नाना पेठे यांनी वैद्यकीय उपचारादरम्यान दिलेल्या लेखी निवेदनावरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                                                                  

From around the web