उमरग्यात अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
उमरग्यात अवैधरित्या तलवार बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

उमरगा: गजानन सिद्राम गाळे, रा. वडार गल्ली, नाईचाकूर, ता. उमरगा याने 17 मार्च रोजी 21.45 वा.सु. गावामध्ये आपली दहशत निर्माण करण्याच्या हेतुने राहत्या गल्लीत तलवार घेउन फिरत असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळुन आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन त्यांच्याविरुध्द भा.दं.सं. कलम- 188 सह शस्त्र अधिनियम कलम- 4, 25 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


सार्वजनिक ठिकाणी धोकादायकपणे वाहन चालवणाऱ्या व उभे करणाऱ्या चालकांवर गुन्हे दाखल

सार्वजनिक ठिकाणी रहदारीस धोका निर्माण होईल, मानवी जिवीतास धोका होईल अशा प्रकारे वाहन उभे करुन, निष्काळजीपणे वाहन चालवून भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन करणाऱ्या 9 वाहन चालकांवर 9 गुन्हे  18 मार्च रोजी दाखल करण्यात आले.

1) उमरगा येथील सचिन सोनटक्के यांनी ॲपे मॅजीक क्र. एम.एच. 25 एएल 6816 तर हिप्परगाराव, ता. उमरगा येथील माधव सुर्यवंशी व अक्षय घाटे यांनी अनुक्रमे ऑटोरीक्षा क्र. एम.एच. 25 एन 0153 व ऑटोरीक्षा क्र. एम.एच. 25 एन 0669 अशी तीन वाहने उमरगा शहरातील महामार्गावर निष्काळजीपणे, धोकादायकरित्या उभी केली असतांना उमरगा पो.ठा. च्या पथकास आढळले.

2) महादेव कांबळे, रा. मुरुम यांनी ऑटोरीक्षा क्र. एम.एच. 25 एम 1029 हा मुरुम- आलुर रस्त्यावर तर बिरु कठारे, रा. सुंदरवाडी, ता. उमरगा यांनी ऑटोरीक्षा क्र. एम.एच. 25 एफ 0809 हा मुरुम- बेळंब रस्त्यावर निष्काळजीपणे, धोकादायकरित्या उभे केले असतांना मुरुम पो.ठा. च्या पथकास आढळले.

3) शरद हावळे, रा. बोरी व दिनेश पलंगे, रा. तुळजापूर या दोघांनी आपापल्या ताब्यातील ऑटोरीक्षा तुळजापूर बसस्थानकयेथील उस्मानाबाद रस्त्यावर निष्काळजीपणे, धोकादायकरित्या उभे केले असतांना तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले.

4) किरण मस्के, रा. नळदुर्ग यांनी ऑटोरीक्षा क्र. एम.एच. 25 एम 254 हा नळदुर्ग येथील महामार्गावर निष्काळजीपणे, धोकादायकरित्या उभा केला असतांना नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले.

5) उत्रेश्वर करंजकर, रा. कळंब हे वाहन क्र. एम.एच. 25 पी 5405 मध्ये हौद्याबाहेर सळई भरुन कळंब पंचायतसमीती समोरील रस्त्यावर निष्काळजीपणे, धोकादायकरित्या वाहतूक करत असतांना कळंब पो.ठा. च्या पथकास आढळले.

“सार्वजनिक ठिकाणी गाड्यावर निष्काळजीपणे अग्नी प्रज्वलीत करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 भुम: भुम येथील जाफर शेख यांनी 18 मार्च रोजी भुम येथील पार्डी रस्त्यालगत आपल्या हातगाड्यावर अग्नी प्रज्वलीत करुन मानवी जिवीतास धोका निर्माण होईल असे निष्काळजीपणाचे कृत्य केले. यावरुन पोलीसांनी सरकातर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 285 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web