कळंबमध्ये गौणखनिज चोरुन नेणाऱ्यावर गुन्हा दाखल

 
कळंबमध्ये गौणखनिज चोरुन नेणाऱ्यावर गुन्हा दाखल

कळंब: मस्सा (खु.) विभागाचे मंडळ अधिकारी- श्री देवानंद कांबळे यांनी पथकासह 08 मार्च रोजी 12.30 वा. सु. मस्सा (खु.) गट क्र. 22 मधे छापा टाकला. यावेळी विजय साहेबराव कवडे, रमेश शामराव कवडे, दोघे रा. कन्हेरवाडी हे गौणखनिज (मुरुम) अवैधरित्या चोरुन नेत असल्याचे आढळले. पथकाने घटनास्थळावरील ट्रॅक्टर- ट्रॉली क्र. एम.एच. 25 एचव 3009 व एक्सकॅव्हेटर यंत्र क्र. एम.एच. 23 बी 7771 ही दोन वाहने तहसील कार्यालय, कळंब येथे सोबत घेउन चलण्यास सांगीतले असता नमूद दोघांनी तसे न करता ट्रॉलीमधील मुरुम खाली ओतून ट्रॅक्टर- ट्रॉली व एक्सकॅव्हेटर यंत्र घेउन निघून गेले. यावरुन देवानंद कांबळे यांनी 11 मार्च रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379, 511, 34 आणि गौण खनीज अधिनियम कलम- 21 (1) (2) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
चोरीचे तीन गुन्हे दाखल 

आंबी: शेळगाव, ता. परंडा येथील गोकुळ बाळासाहेब शेवाळे यांच्या राहत्या घराचे कुलूप अज्ञाताने 10- 11 मार्च दरम्यानच्या रात्री तोडून घरातील कपाटात ठेवलेले 77 ग्रॅम सोन्याचे दागिने व 40,000 ₹ रोख रक्कम असा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या गोकुळ शेवाळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 उमरगा: डोंगरगाव, ता. निलंगा येथील रमेश हिराजी बिराजदार हे 07 मार्च रोजी 15.00 वा. सु. उमरगा येथील साप्ताहिक बाजारात असतांना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेउन त्यांच्या जवळील स्मार्टफोन चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या रमेश बिराजदार यांनी 11 मार्च रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 
 वाशी: पिंपळगाव (लिं.), ता. वाशी येथील तुकाराम दगडु अजाब यांनी धान्याची पोती गावातीलच आपल्या घरात ठेवली होती. त्या घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि. 10- 11 मार्च दरम्यानच्या रात्री तोडून आतील सोयाबीन पोती- 10, हरभरा पोती- 9, ज्वारीची पोती- 5 व गव्हाचे 1 पोते असा माल चोरुन नेला आहे. अशा मजकुराच्या तुकाराम अजाब यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 457, 380 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web