उमरग्यात हॉटेलची उधारी न दिल्याने २१ वर्षे युवकाचा दगडाने ठेचून खून 

 
उमरग्यात हॉटेलची उधारी न दिल्याने २१ वर्षे युवकाचा दगडाने ठेचून खून

 उमरगा : हॉटेलची उधारी न दिल्याने २१ वर्षे युवकाचा  दगडाने ठेचून खून करण्यात आल्याची घटना शहारत घडली आहे. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दखल करण्यात आला आहे. 


कोळीवाडा, मुळज रोड, उमरगा येथील आकाश दत्तात्रय आबाचने, वय 21 वर्षे, यांचा मृतदेह दि. 21/04/2021 रोजी 06.00 वा. मुळज रोड, नगर परीषद गाळयाचे समोर आढळला होता. रोहीत चुंगे, आकाश धोत्रे, व्यंकट धोत्रे, प्रशांत पुरातले, रा. उमरगा, विकास जाधव रा. तुरोरी, यांनी आकाश यांना हॉटेलच्या उधारीवरुन दगडाने डोक्यात मारुन ठार केले आहे. अशा मजकुराच्या मयताचा भाउ- राजेंद्र यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. द. सं. कलम  302, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

अपहरण

लोहारा: पो. ठा. लोहारा हददीतील राहणारी एक 17 वर्षीय मुलगी हीचे अज्ञाताने अपहरण केले आहे. अशा मजकुराच्या मुलीच्या पित्याने दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा. दं. सं. कलम- 363  अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

From around the web