देशात कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणं योग्य नाही - नवाब मलिक

 
देशात कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणं योग्य नाही - नवाब मलिक

मुंबई -  देशात कलेला आणि अभिनयाला धर्माचा चष्मा लावणं योग्य नाही मात्र भाजपला धर्माचा चष्मा लावल्याशिवाय जमत नाही अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे. 


शिवसेनेने अजान स्पर्धा आयोजित केली आहे. त्या स्पर्धेला भाजपाने आक्षेप घेतला असून या आक्षेपाला नवाब मलिक यांनी आपल्या भाषेत उत्तर दिले आहे. 


शिवसेनेने अजान स्पर्धा सुरू केली असून या स्पर्धेला भाजपने आक्षेप घेतला आहे. मात्र सोलापूर व इतर जिल्हयात घेण्यात आलेल्या गीतापठण कार्यक्रमात मुस्लिम मुलींनी पहिला क्रमांक पटकावला होता. ही सत्य परिस्थिती आहे याची आठवणही नवाब मलिक यांनी भाजपला करुन दिली आहे. 


दिलीप कुमार, शाहरुख खान, सलमान खान यांनी सिनेमामध्ये अनेक भूमिका केल्या आहेत. शिवाय मंदिरामध्ये सीनही केले आहेत याचा अर्थ त्यांनी धर्मांतर केले आहे असे होत नाही असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.

From around the web