विधान परिषद निवडणूक : मराठवाड्यातील मुस्लिम नेत्यास काँग्रेस संधी देणार का ?

 
विधान परिषद निवडणूक : मराठवाड्यातील मुस्लिम नेत्यास काँग्रेस संधी देणार का ?


उस्मानाबाद - महाराष्ट्र विधान परिषदेच्या ९ जागांसाठी २१ मे रोजी मतदान होणार आहे. या जागांसाठी फॉर्म भरण्यास प्रारंभ झाला असून ११ मे पर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. या ९ पैकी २ जागेवर काँग्रेसने दावा केला आहे. काँग्रेसने दोन पैकी एक जागा  मराठवाड्यातील मुस्लिम नेत्यास द्यावी, अशी मागणी असंख्य मुस्लिम कार्यकर्त्यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती सोनिया गांधी यांच्याकडे केली आहे. 


काँग्रेसची वोट बँक म्हणून मुस्लिम समाज ओळखला जात होता, परंतु एमआयएमच्या स्थापनेनंतर हा समाज विखरला गेला आहे. मराठवाड्यात  एमआयएम पक्षाचे जाळे मोठ्या प्रमाणात विणले गेले आहे. त्यामुळे मुस्लिम मतदार काँग्रेसपासून दुरावत चालला आहे, त्यासाठी त्यांच्या हक्काचा आमदार आणि प्रतिनिधी देण्यासाठी मराठवाड्यातील एका मुस्लिम नेत्यास विधान परिषदेवर प्रतिनिधित्व देण्यात यावे. ती निवड करताना विधानसभा निवडणुकीत पराभूत  झालेल्या उमेदवारास उमेदवारी न देता अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या निष्ठावंत नेत्यास प्रतिनिधित्व देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. 

मराठवाड्यात एम.एम. शेख ( औरंगाबाद ) आणि खलील सय्यद ( उस्मानाबाद ) यांच्यापैकी एकास उमेदवारी देण्यात यावी, किमान राज्यपाल नियुक्त आमदारसाठी उभयतांची शिफारस करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन काँग्रेसच्या विविध नेत्यांना पाठवण्यात आले आहे. 

From around the web