शेतकर्‍यांचा अपमान करणार्‍या दानवेंची  मंत्रीमंडळातून  हकालपट्टी करा 

 
शेतकर्‍यांचा अपमान करणार्‍या दानवेंची  मंत्रीमंडळातून  हकालपट्टी करा

मुंबई  - देशातील शेतकर्‍यांना खलिस्तान, पाकिस्तान आणि चीन हा आरोप करुन शेतकर्‍यांचा अपमान करणार्‍या केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांचा राजीनामा घेवून मंत्रीमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तान आहे असे सांगितले आहे त्यावर नवाब मलिक यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. 


रावसाहेब दानवे हे केंद्रीयमंत्री आहेत त्यामुळे ही सरकारची भूमिका आहे की, रावसाहेब दानवे यांची हे सरकारने स्पष्ट करावे. जर सरकारची भूमिका असेल तर तोमर यांच्यासोबत बैठका का घेतल्या. गृहमंत्री अमित शहा का बैठका घेत आहेत. आणि असं असेल तर सरकारने काय केलं आहे असा सवालही नवाब मलिक यांनी केला आहे.

सर्व टेलिकॉम सेक्टरमध्ये एकाधिकारशाही निर्माण करण्याच्यादृष्टीने केंद्रसरकारची पावले - नवाब मलिक


 टेलिकॉम सेक्टरमध्ये ज्या कंपन्या आहेत त्यांच्या सर्व्हिसेसमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. ही सगळी व्यवस्था देशात निर्माण होत चालली असून सर्व टेलिकॉम सेक्टरमध्ये एकाधिकारशाही निर्माण करण्याच्यादृष्टीने केंद्रसरकारची पावले पडत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. 


टेलिफोन बुथसारखी वायफाय सेंटर उघडण्याची पॉलिसी केंद्र सरकार आणतेय. ही पॉलिसी कुणासाठी आणणार आहे. एका विशेष कंपनीसाठी पॉलिसी आणणार आहे का? असा खोचक सवालही नवाब मलिक यांनी केला आहे. 


या देशात दुरसंचार विभागांतर्गत बीएसएनएल, एमटीएनएल असतील सगळी व्यवस्था ठप्प झाली आहे. कुणीही लक्ष देत नाही. हे सगळं एका कंपनीला देण्याच्या तयारीत असल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे. 


एकाधिकारशाही करुन केंद्र सरकारला डाटा गोळा करायचा आहे का? याअगोदर आधारकार्ड च्या माध्यमातून डाटा गोळा करून दुरुपयोग करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून झाल्याचेही नवाब मलिक यांनी सांगितले. 


ही सगळी वाटचाल एका विशिष्ट कंपनीसाठी आहे. हा देशाला फार मोठा धोका होवू शकतो. ओपनिंगमध्ये स्पर्धा असली पाहिजे परंतु एकाधिकारशाहीच्यादृष्टीने सरकार पावले टाकत असेल तर ते योग्य नाही. यामुळे देशात वेगळी परिस्थिती निर्माण होऊ शकते अशी भीतीही नवाब मलिक यांनी व्यक्त केली आहे.

From around the web