कोरोना : राज्यातील ६० तुरूंगांतील ११ हजार आरोपी / गुन्हेगारांची पॅरोलवर सुटका होणार

 
कोरोना : राज्यातील ६० तुरूंगांतील ११ हजार आरोपी / गुन्हेगारांची पॅरोलवर सुटका होणार


मुंबई - कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कारागृहातील कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी राज्याच्या गुह विभागाने नवा आदेश जरी केला आहे. ७ वर्ष किंवा त्याहून कमी शिक्षेस पात्र असलेल्या राज्यातील ६० तुरूंगांतील जवळ-जवळ ११,००० आरोपी / गुन्हेगारांना तातडीने  पॅरोलवर  करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत.

राज्यात कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. राज्यात  कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 124 झाली आहे. चार  जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात २१ दिवस लॉकडाऊन करण्यात आला आहे. लोकांनी घराच्या बाहेर पडू नये अशी सक्ती करण्यात आली आहे.

याच पार्श्वभूमीवर राज्यातील कारागृहातील कैद्यांची संख्या कमी करण्यासाठी राज्याच्या गुह विभागाने पाऊल उचलले आहे. राज्यातील ६० तुरूंगांतील जवळ-जवळ ११,००० आरोपी / गुन्हेगारांना तातडीने  पॅरोल देण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. गृहमंत्री देशमुख यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. 

From around the web