पुण्यात कोरोनाचा आणखी एक बळी

 
पुण्यात कोरोनाचा आणखी एक बळी


पुणे - राज्यात कोरोना विषाणूचा विळखा वाढत चालला आहे. कोरोना व्हायसरमुळे पुण्यात तिसरा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांपूर्वी एका 60 वर्षीय महिलेला मयत अवस्थेत ससून रुग्णालयात आणले होते. या महिलेच्या घशातील द्राव तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. हा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे मागील काही दिवसात या महिलेच्या संपर्कात कोण कोण आले त्या सर्वांचा शोध घेतला जात आहे. विशेष बाब म्हणजे या महिलेला नायडू रुग्णालयात संशयित म्हणून दाखल करण्यात आले होते. तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र आता मृत्यूनंतर तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

राज्यात शनिवारी २४ तासांत एकूण १४५ नव्या रुग्णांची नोंद असून राज्यातील रुग्णांचा तपशील : मुंबई ३७७, ठाणे मनपा ७७, पुणे व ग्रामीण ८२, सांगली २५, नागपूर-अहमदनगर प्रत्येकी १७, लातूर ८, बुलडाणा 8, यवतमाळ ४, सातारा, औरंगाबाद, उस्मानाबाद प्रत्येकी ३, कोल्हापूर, रत्नागिरी, जळगाव प्रत्येकी २, सिंधुदुर्ग, गोंदिया, नाशिक, अमरावती, हिंगोली प्रत्येकी १ आणि गुजरातेत १.

सध्या राज्यात ४२ हजार ७१३ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून २९१३ जण संस्थात्मक क्वाॅरंटाइनमध्ये आहेत. मरकजमधील रुग्णांचा आकडा ७ वर स्थिर आहे. यात निलंग्यातील रुग्णांचा समावेश नाही.राज्यात शनिवारी ७०८ जण भरती झाले. आजवरच्या १४,५०३ नमुन्यांपैकी १३, ७१७ जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. ६३५ जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत ५२ करोनाबाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

From around the web