कोरोना : पुणे जिल्ह्यात एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू

 

कोरोना :  पुणे जिल्ह्यात एकाच दिवशी पाच जणांचा मृत्यू

पुणे- पुण्यात कोरोना विषाणूमुळे आणखी तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे लोक आधीच काही आजाराने ग्रस्त होते. आज पहाटे जिल्ह्यात आणखी दोन जणांचा मृत्यू झाला. म्हणजेच पुणे जिल्ह्यात  5 लोकांचा मृत्यू झाला आहे. यासह, मृत्यूची संख्या येथे 13 वर आली आहे.राज्यात  कोरोना बाधित रुग्णाचा आकडा एक हजार पार झालेला आहे. राज्यात कोरोनाबाधित 150 नवीन रुग्णांची आज नोंद झाली. यामुळे राज्यातील रुग्ण संख्या 1018  झाली आहे. यामध्ये मुंबई 116, पुणे 18,अहमदनगर 3, बुलढाणा 2, ठाणे 2, नागपूर 3, सातारा 1, औरंगाबाद 3, रत्नागिरी 1, सांगली 01 असा तपशील आहे.

कोरोनाबाधितांचे वाढते आकडे पाहता मुंबई आणि पुण्यातील लॉकडाऊन दोन आठवड्यांनी वाढू शकतो. राज्य मंत्रिमंडळाच्या काल (7 एप्रिल) झालेल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली.


आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतात कोरोना विषाणूमुळे १४९  लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 5,194 प्रकरणे नोंदली गेली आहेत. यापैकी ४६६३ लोकांवर उपचार सुरू आहेत. 401 रुग्ण बरे झाले आहेत. आज मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 773 प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि 35 लोकांचा मृत्यू झाला आहे.

From around the web