पुण्यात आणखी एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला ...

 


पुण्यात आणखी एक कोरोनाग्रस्त रुग्ण आढळला ...

पुणे - पुण्यात कोरोना बाधित आणखी एक रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ८ वर गेली आहे तर पिंपरी चिंचवड मध्ये १० तर राज्यात एकूण संख्या ४२ झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून राज्यात विविध उपाययोजना सुरु आहेत.

नेदरलॅंड आणि फ्रान्सहून प्रवास करून आलेली पुण्यातील महिला कोरोना पॉझिटिव्ह ठरली आहे. त्यामुळे पुण्यातील जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 18 गेली आहे. 

देशातील कोरोना बाधितांची संख्या वाढून 138वर पोहोचली आहे. दिल्ली, कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये कोविड-19 मुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे. भारतात एकूण 137 कोरोनाबाधित असून त्यापैकी 24 एनआरआय आहेत. 

दरम्यान, राज्यात काही दिवसात 4 ते 5 ठिकाणी प्रयोगशाळा वाढविण्यात येणार आहे.त्यामुळे सोशल मीडियावर सध्या कोरोनाच्या रक्त चाचणीसाठी महाराष्ट्रातील हॉस्पिटलची यादी व्हायरल होत असून कोरोनाच्या तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नाही.नागरिकांनी चुकीच्या संदेशांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे. 

From around the web