गायिका गरजाबाई भुंबे यांना लिहिता वाचता येत नाही, तरीही ५०० हुन अधिक गाणी गायिली ... 

गजराबाईचे 'येडामाय खेळतीया फुगडी' गाणं तुफान लोकप्रिय 
 
gajrabai bhumbe

पुणे - या आहेत पुण्याच्या गायिका गरजाबाई भुंबे .वय वर्षे ६५ .पण आवाज एकदम पहाडी.लिहिता - वाचता येत नाही, पण त्यांना एकदा मुखडा आणि अंतरा सांगितला आणि चाल समजावून सांगितले की तोंडपाठ गाणं झालं म्हणून समजा. 

तुळजाभवानी, काळूबाई, येडाई , रेणुका माता आदी देवीवर भक्तिगीते  तसेच ५००हुन अधिक लोकगीते त्यांनी गायिली आहेत. वयाच्या १७ व्या वर्षांपासून त्या गाणी गात आहेत आणि ऐकणारे मंत्रमुग्ध होत आहेत. 

महिला दिनी गरजाबाई भुंबे यांच्या आवाजात  पत्रकार आणि गीतकार सुनील ढेपे यांनी  लिहिलेले  येडामाय खेळतीया फुगडी  हे गाणं स्टार म्युझिकल स्टुडिओमध्ये रेकॉर्ड झालं होतं ते ९ मार्च रोजी मुक्तरंग म्युझिक चॅनलवर रिलीज झालं असून, हे गाणं लोकांच्या पसंतीस उतरले आहे. 

आपणही हे संपूर्ण गाणं नक्की ऐका 

From around the web