दिलासा : एकही रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह नाही !

 
दिलासा :  एकही रुग्ण कोरोना पॉजिटीव्ह नाही !

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यात गेल्या २७ दिवसात दररोज एक तरी रुग्ण  कोरोना पॉजिटीव्ह येत होता. सोमवारचा दिवस दिलासाजनक ठरला असून, आज एकही रिपोर्ट कोरोना पॉजिटीव्ह नाही. त्यामुळे जिल्हयातील  लोकांनी आज समाधानाचा सुस्कारा सोडला.


आज ८ जून रोजी  उस्मानाबाद जिल्हा सामान्य रुग्णालयातून 34 स्वाब  तपासण्यासाठी लातूर  येथे पाठवण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून 31 नेगेटिव्ह, दोन inconclusive
व एक रिजेक्ट असा आला आहे. विशेष म्हणजे रविवारी देखील फक्त एक रुग्ण पॉजिटीव्ह आला होता. 


जिल्हयात रुग्णाची संख्या अशी 

उस्मानाबाद जिल्ह्यात आजपर्यंत सापडलेले कोरोना रुग्ण - 123
एकूण बरे झालेले  रुग्ण - 70
उपचार घेत असलेले रुग्ण -50
एकूण मृत्यू पावलेले रुग्ण - 3
 


तालुकानिहाय रुग्ण 

उस्मानाबाद - 43
कळंब- ३३
उमरगा - १६
परंडा - ११
लोहारा - ८
वाशी - ४
तुळजापूर - ५
भूम - ३ From around the web