कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात आठ रुग्ण वाढले

 
कोरोना : उस्मानाबाद जिल्ह्यात आठ रुग्ण वाढले

उस्मानाबाद - उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ जणांचा कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आलेला आहे. त्यात तुळजापूर तालुक्यातील चार आणि दोन उस्मानाबाद आणि उमरगा आणि वाशी येथील प्रत्येकी एक असा समावेश आहे.

आज २७ जून रोजी  सामान्य रुग्णालय उस्मानाबाद येथून 64 स्वाब तपासणी साठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय लातूर येथे पाठविण्यात आले होते, सर्व रिपोर्ट्स प्राप्त झाले असून आठ पॉजिटीव्ह , चार inconclusive व 52 निगेटिव्ह रिपोर्ट आले आहेत.

दोन रुग्ण हंगरगा ता. तुळजापूर, एक रुग्ण  सलगरा (दिवटी ) ता. तुळजापूर, येथील असून पूर्वीच्या पॉजिटीव्ह रुग्णाच्या  संपर्कातील आहेत. एक रुग्ण  प्रॉपर तुळजापूर येथील आहे. असे एकूण चाररुग्ण  तुळजापूर तालुक्यातील आहेत.
दोन रुग्ण एमआयडीसी ,  उस्मानाबाद येथील आहेत. एक रुग्ण  बालाजी नगर,  उमरगा येथील व एक रुग्ण  वाशी येथील असून तो बाहेर देशातून आलेला आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यात

कोरोना बाधित रुग्ण - २०६
बरे झालेलं रुग्ण - १५९
मृत्यू - ९
ऍक्टिव्ह रुग्ण ३८From around the web