Video : उस्मानाबादेत जनता कर्फ्यू : सर्व व्यवहार ठप्प

 
 Video : उस्मानाबादेत जनता कर्फ्यू : सर्व व्यवहार ठप्प
उस्मानाबाद - कोरोना व्हायरसचा संसर्ग होवु नये म्हणून आज देशभर जनता कर्फ्यू सुरु आहे, उस्मानाबाद शहर आणि जिल्ह्यात जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून, सर्व ठिकाणी व्यवहार ठप्प आहेत, लोक आपापल्या घरी बसून असून, रस्त्यावर शुकशुकाट दिसत आहे.

उस्मानाबाद शहरात एरव्ही गजबजणारे रस्ते गेल्या काही दिवसापासून ठप्प होत चालले आहेत . ३१ मार्च पर्यंत काही आत्यावश्य्क सेवा वगळता सर्व व्यवहार बंद करण्यात आले होते, त्यात आज जनता कर्फ्यू लागू असून, रस्ते सामसूम दिसत आहेत. 


कोरोना व्हायरस  जीवावर बेतणार आहे, हे जेव्हा लोकांच्या लक्षात आले तेव्हापासून लोकांनी चांगलाच धसका घेतला आहे, लोक शासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देत आहेत.


Video


From around the web